तन्वी सिद्धेश्वर साखरे तरुणीचा मृत्यू
पुण्यात राहणारी तन्वी साखरे ही तरुणी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून प्रवास करत होती. तन्वी दुचाकी चालवत होती तर तिचे वडील मागच्या सीटवर बसले होते. याचदरम्यान मागून येणाऱ्या एका डंपरने अचानक वेगात दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोघंही रस्त्यावर फेकले गेले. पण गाडी चालवत असलेली तन्वी डंपरच्या चाकाखाली आहे. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम
डंपरचा वेग खूप जास्त होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम राबवली. अनेक तासांच्या तपासानंतर अखेर सायंकाळच्या सुमारास आरोपी डंपर चालक अजय ढाकणे याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हिंजवडीसारख्या वर्दळीच्या भागात मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे. मालवाहू वाहनांची अनियंत्रित वाहतूक ही गेल्या काही महिन्यांपासून मोठी समस्या बनली असल्याचं स्थानिक नागरिक सांगतात.
11 महिन्यांत सात महिलांचा मृत्यू
दरम्यान, गेल्या 11 महिन्यांत याच प्रकारच्या RMC आणि डंपर वाहनांनी केलेल्या अपघातांत तब्बल सात महिलांचा मृत्यू झाला असला तरी कोणतीही ठोस उपाययोजना अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे आता हिंडवडीचा प्रश्न प्रशासन कधी सोडवणार? असा सवाल विचारला जात आहे.
