TRENDING:

चेहऱ्यावरचे हावभाव पाहून थांबवलं; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या बॅगमध्ये काय दडलेलं? पुणे विमानतळावर थरार

Last Updated:

हा प्रवासी विमानतळावरून घाईगडबडीत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या संशयास्पद हालचाली Customs अधिकाऱ्यांच्या लगेच लक्षात आल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून तब्बल दोन कोटींहून अधिक किमतीचा उच्च दर्जाचा 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त करण्यात आला आहे.
प्रवाशाच्या बॅगमध्य़े गांजा (प्रतिकात्मक फोटो)
प्रवाशाच्या बॅगमध्य़े गांजा (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या एका विमानातून उतरलेल्या प्रवाशाला सीमाशुल्क विभागाच्या पथकाने ८ डिसेंबर रोजी ताब्यात घेतलं. हा प्रवासी विमानतळावरून घाईगडबडीत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या संशयास्पद हालचाली Customs अधिकाऱ्यांच्या लगेच लक्षात आल्या. तातडीने त्याला चौकशीसाठी थांबवण्यात आलं आणि त्याच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली.

Pune Crime: प्रतिष्ठित संस्थेत पियानो शिकण्यासाठी गेलेल्या मुलावर अत्याचार, ऐकताच आई हादरली, पोलिसांत धाव

advertisement

तपासणीदरम्यान, प्रवाशाच्या बॅगमध्ये अतिशय उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण २ किलो २९९ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. Customs अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात नियंत्रित वातावरणात लागवड केलेल्या या 'हायड्रोपोनिक गांजा'ची किंमत प्रचंड आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत दोन कोटी २९ लाख रुपये इतकी आहे.

चौकशीत या प्रवाशाने हा गांजा बँकॉकहून आणल्याची कबुली दिली आहे. मात्र, हा गांजा पुण्यामध्ये किंवा भारतामध्ये नेमका कोणाला पुरवायचा होता, यामागे आंतरराष्ट्रीय तस्करीचे कोणते जाळे कार्यरत आहे, याचा सखोल तपास सीमाशुल्क विभागाचे अधिकारी करत आहेत. अलीकडच्या काळात 'हायड्रोपोनिक गांजा' तस्करीचे प्रकार वाढल्यामुळे विमानतळ आणि Customs पथकांना विशेष सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

advertisement

चोरीची विचित्र घटना - 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान पुण्यातून चोरीची एक अतिशय अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एका सराफ व्यावसायिकाला त्यांच्याच विश्वासू कामगाराकडून फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे. भोसरीतील गुडविल चौकात शुक्रवारी (५ डिसेंबर) रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत सराफाने दागिन्यांची पिशवी कामगाराकडे दिली आणि तो लघुशंकेसाठी गेला. यावेळी कामगार ८० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
चेहऱ्यावरचे हावभाव पाहून थांबवलं; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या बॅगमध्ये काय दडलेलं? पुणे विमानतळावर थरार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल