TRENDING:

Pune Crime: 'आमच्या गाडीला कट का मारला'? कोंढव्यातील महिलेनं तरुणाला रस्त्यात अडवलं, मग रागात नको ते केलं

Last Updated:

दुचाकी चालवताना केवळ 'कट' मारल्याच्या साध्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: दुचाकी चालवताना केवळ 'कट' मारल्याच्या साध्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महिलेचा तरुणावर जीवघेणा हल्ला (प्रतिकात्मक फोटो, Canva)
महिलेचा तरुणावर जीवघेणा हल्ला (प्रतिकात्मक फोटो, Canva)
advertisement

नेमकी घटना काय?

तक्रारदार तरुणाचा पुतण्या शुक्रवारी (६ मार्च) रात्री १० वाजण्याच्या सुमारास कोंढवा खुर्द येथील मक्का ओम सोसायटी परिसरातून दुचाकीवरून जात होता. यावेळी दुचाकीवरून जात असताना काही कारणावरून त्याचा आणि आरोपींचा वाद झाला. "तू कट का मारला?" या कारणावरून संतापलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी आणि एका महिलेने तरुणाला गाठले आणि त्याला थांबवले.

advertisement

पुणे हादरलं! दगडाच्या ढिगाऱ्यात नग्नावस्थेत आढळला तरुण, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक उलगडा

वादाचे रूपांतर काही क्षणांतच हाणामारीत झाले. या टोळक्याने तरुणाला अक्षरशः बेदम मारहाण केली. केवळ मारहाण करून न थांबता, त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने तरुणाच्या डोक्यात वार करण्यात आले. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी महिलेसह अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
2 बहिणी बनल्या बॉस, नोकरी अन् शिक्षण सांभाळत करतात मोमोज व्यवसाय, इतकी कमाई
सर्व पहा

पोलिस उपनिरीक्षक खोपडे अधिक तपास करत आहेत. दुचाकी चालवताना होणाऱ्या वादातून थेट जीवघेणा हल्ला करण्यापर्यंतची मजल गाठल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोपी महिलेचा आणि अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यासाठी कोंढवा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: 'आमच्या गाडीला कट का मारला'? कोंढव्यातील महिलेनं तरुणाला रस्त्यात अडवलं, मग रागात नको ते केलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल