advertisement

पुणे हादरलं! दगडाच्या ढिगाऱ्यात नग्नावस्थेत आढळला तरुण, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक उलगडा

Last Updated:

१४ फेब्रुवारी रोजी खळदच्या गोटेमाळ परिसरात एक तरुण नग्न आणि बेशुद्ध अवस्थेत दगडांच्या ढिगाऱ्यात आढळला होता.

शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा (प्रतिकात्मक फोटो)
शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा (प्रतिकात्मक फोटो)
सासवड : पुरंदर तालुक्यातील खळद येथील गोटेमाळ परिसरात काही दिवसांपूर्वी एक तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. आता उत्तर प्रदेशातील या तरुणाचा मृत्यू हा अपघात नसून, तो एक 'क्रूर खून' असल्याचे उघड झाले आहे. डोक्यावर गंभीर वार करून या ३३ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
१४ फेब्रुवारी रोजी खळदच्या गोटेमाळ परिसरात एक तरुण नग्न आणि बेशुद्ध अवस्थेत दगडांच्या ढिगाऱ्यात आढळला होता. सुरुवातीला हा अपघात असावा असा संशय होता. सासवड पोलिसांनी त्याला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र दुर्दैवाने २२ फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. मृताचे नाव मिश्रीलाल छोटेलाल (वय ३३, रा. उन्नाव, उत्तर प्रदेश) असे असून, तो येथे का आणि कसा आला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
advertisement
शुक्रवारी (६ मार्च) आलेल्या शवविच्छेदन अहवालाने प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. मयताच्या डोक्यावर गंभीर इजा असून, ही हत्या असल्याचं समोर आलं आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी त्याला निर्जन स्थळी गाठून क्रूरपणे मारहाण केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला दगडांच्या ढिगाऱ्यात फेकून दिले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक कुमार कदम अधिक तपास करत आहेत. या गुन्ह्याबाबत काही माहिती असल्यास ९०११०७९६२२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! दगडाच्या ढिगाऱ्यात नग्नावस्थेत आढळला तरुण, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक उलगडा
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement