मिळालेल्या माहितीनुसार, फुकट वस्तू मिळवण्याच्या उद्देशाने आलेल्या पाच ते सहा जणांच्या या टोळक्याने दुकानदाराकडे मोफत सिगारेटची मागणी केली. दुकानदार त्यांच्याशी बोलत असतानाच, टोळक्यातील एका आरोपीने अचानक कोयता बाहेर काढून दुकानात तोडफोड करण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण थरार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, मात्र याची पर्वा न करता हल्लेखोरांनी आपला हल्ला सुरूच ठेवला.
advertisement
विशेष म्हणजे, या हल्लेखोरांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. भरदिवसा अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विमाननगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिक या गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
फुरसुंगीमध्येही तोडफोड
4-5 दिवसांआधीच फुरसुंगीमध्येही एक घटना समोर आली होती. यात टोळक्यांनी हातामध्ये कोयता घेऊन २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली. फुरसुंगीतील हांडेवाडीमधील आदर्शनगरमध्ये ही घटना घडली होती. कोयता गँगने रिक्षा, कारची तोडफोड केली. ही तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. कोयता गँगने घोषणाबाजी करत वाहनांची तोडफोड केली. दहशत माजवण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केलं.
