पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या दोन हजाराहून अधिक बस आहेत, त्यापैकी 1,400 बस सीएनजीवर चालतात. सीएनजी बससाठी आतापर्यंत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)कडून नांदेड वाडी, कात्रज, हडपसर, कोथरूड आणि पिंपरी येथे पाच सीएनजी पंप उभारण्यात आले आहेत. काही पंपांवर बसची गर्दी कमी करण्यासाठी डिस्पेन्सरची संख्या वाढवण्यात आली आहे.
नांदेड वाडी येथील पीएमपीच्या जागेत नागरिकांसाठीही सीएनजी पंप उपलब्ध आहे. यामुळे पीएमपीच्या बसना सीएनजीच्या किमतीत सवलत मिळत असून, प्रवासी सेवेवरही परिणाम होतो आहे. पीएमपीचे नवीन अध्यक्ष पंकज देवरे यांनी महसुलात वाढ करण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यात प्रमुख आगारांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे.
advertisement
सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी यांनी सांगितले की, सीएनजी पंप सुरू केल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल. शहरात सीएनजीवर चालणारी वाहनांची संख्या खूप जास्त आहे.परंतु, पंपांची संख्या तुलनेने कमी आहे. यामुळे वाहनधारकांना लांब रांगा लागतात आणि वेळ वाया जातो. नवीन पंपांमुळे ही समस्या कमी होईल.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही वर्षांत सीएनजी पंपांची संख्या वाढवण्यात आलेली नाही, ज्यामुळे वाहनधारक गंभीर समस्येत आहेत. सध्या उपलब्ध पंपांवर रांगा लागणे, प्रवासासाठी वेळ जास्त लागणे आणि वाहनधारकांचा त्रास वाढणे ही सामान्य समस्या बनली आहे. पीएमपीच्या जागेत उभारले जाणारे नवीन सीएनजी पंप हे या समस्येवर प्रभावी तोडगा ठरणार आहेत.
या उपक्रमामुळे पीएमपीच्या बससेवेवर देखील फायदा होणार आहे. सीएनजी उपलब्धतेत सुधारणा झाल्यामुळे बस ताफ्यातिल वाहन अधिक सुरळीत चालेल तसेच वेळेत बस सेवा देणे शक्य होईल आणि प्रवाशांसाठीही सुविधा वाढेल. पीएमपीच्या आगामी योजनांमध्ये आणखी काही ठिकाणी सीएनजी पंप उभारण्याचा विचार आहे,ज्यामुळे शहरातील वाहनधारकांना दीर्घकालीन सुविधा मिळेल.
शहरातील वाहनधारकांसाठी हा निर्णय अत्यंत सकारात्मक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सीएनजी पंपांची उपलब्धता वाढल्यामुळे रांगा कमी होतील, वेळ वाचेल आणि वाहनधारकांचा रोजचा त्रास कमी होईल. याशिवाय, पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि बससेवा अधिक कार्यक्षम होईल, असा दोन्ही बाजूंनी फायदा होणारा परिणाम दिसून येत आहे.
स्वारगेट, निगडी आणि शेवाळेवाडी येथे सुरू होणारे तीन नवीन सीएनजी पंप शहरातील वाहनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. यामुळे फक्त पीएमपीच्या बस ताफ्याचा फायदा न राहता सर्वसामान्य वाहनधारकांनाही सीएनजी सहज उपलब्ध होणार आहे. पीएमपीचे हे पाऊल शहरातील वाहतूक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही उपयुक्त ठरणार आहे.