TRENDING:

घरासमोर झोपलेला कुत्रा अचानक गायब झाला, CCTV पाहून सर्वांना घाम फुटला; पुण्यातील भयानक VIDEO

Last Updated:

कुत्र्यासोबत रात्री जे घडलं ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. हे दृश्य धक्कादायक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रायचंद शिंदे/पुणे : जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. घरासमोर झोपलेला एक कुत्रा अचानक गायब झाला आहे. कुत्र्यासोबत नेमकं काय घडलं हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर सर्वांना घाम फुटला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालासुद्धा धडकी भरेल.
फोटो - व्हिडीओ ग्रॅब
फोटो - व्हिडीओ ग्रॅब
advertisement

आंबेगाव तालुक्यातील ढोबळेवाडी- जारकरवाडी इथली ही घटना आहे. इथं राहणारे उद्योजक अविनाश बाबुराव ढोबरे यांच्या घरासमोर एक कुत्रा झोपला होता. हा कुत्रा अचानक गायब झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असतात, त्यात जे दिसलं ते धक्कादायक होतं.

मुलाला स्कूल बसपर्यंत सोडायला गेली व्यक्ती, गायीने पायाखाली तुडवलं; भयानक VIDEO

एका बिबट्याने या कुत्र्याची शिकार केली. व्हिडीओत बिबट्या कुत्र्यावर हल्ला करताना दिसला. बिबट्याने कुत्र्याला जबड्यात धरून ओढत नेलं आहे.

advertisement

नाशकातही बिबट्याने केली होती कुत्र्याची शिकार

याआधी नाशकातही घराच्या आवारात बसलेल्या एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होत. नाशिकच्या मुंगसरे गावात ही घटना घडली आहे. शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या आवारात पाळीव कुत्रा रात्रीच्या सुमारास बसलेला होता. तितक्यात बिबट्या तिथं आला. यावेळी किशोर उगले यांच्या पाळीव कुत्र्याने त्या बिबट्याला चकवा दिला. मात्र, त्यानंतर बिबट्याने कुत्र्यावर झडप घेतली. बिबट्याने कुत्र्यावर झडप घेतल्यानंतर कुत्र्यानेही या बिबट्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. मात्र, या हल्ल्यात कुत्र्याचा बळी गेला. गावात शिरुन बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

Viral Video : हत्तीसमोर मारत होती स्टाईल, पुढच्याच क्षणी तरुणीला उचलून फेकलं

शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना कैद झाली. सीसीटीव्हीत दिसत आहे की, एक कुत्रा घराच्या आवारात असलेल्या छोट्या कट्ट्यावर बसलेला आहे. काही सेकंदातच सीसीटीव्हीत बिबट्याही दिसतो. तितक्यात कुत्रा बिबट्याला पाहून चकवा देतो आणि घराच्या आवारात उडी घेतो. त्यानंतर बिबट्या त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करतो. पण कुत्रा त्याला चकवा देत पुन्हा कठड्यावर उडी घेतो. यानंतर बिबट्या कुत्र्यावर झडप घेतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मालामाल करणारी रताळी शेती, 5 एकरांत 750 क्विंटल उत्पादन, शेतकऱ्याला 8 लाख नफा
सर्व पहा

एएनआयने हा व्हिडीओ पोस्ट केला होता.

मराठी बातम्या/पुणे/
घरासमोर झोपलेला कुत्रा अचानक गायब झाला, CCTV पाहून सर्वांना घाम फुटला; पुण्यातील भयानक VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल