advertisement

Viral Video : हत्तीसमोर मारत होती स्टाईल, पुढच्याच क्षणी तरुणीला उचलून फेकलं

Last Updated:

जंगलातील अवाढव्य प्राणी म्हणजे हत्ती. हत्तीला खूप कमी राग येतो मात्र जेव्हा येतो तेव्हा त्याच्या एका हल्ल्यात माणून जमिनीदोस्त होऊ शकतो.

हत्तीसमोर मारत होती स्टाईल, पुढच्याच क्षणी तरुणीला उचलून फेकलं
हत्तीसमोर मारत होती स्टाईल, पुढच्याच क्षणी तरुणीला उचलून फेकलं
नवी दिल्ली : जंगलातील अवाढव्य प्राणी म्हणजे हत्ती. हत्तीला खूप कमी राग येतो मात्र जेव्हा येतो तेव्हा त्याच्या एका हल्ल्यात माणून जमिनीदोस्त होऊ शकतो. त्यामुळे पहायला जरी हत्ती भारी वाटत असला तरी त्याच्यापासून नेहमीच सावध रहायला हवं, कारण तो कधी हल्ला करेल सांगू शकत नाही. अशातच एक हत्तीचा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तो तरुणीला सोंडेच्या एका झटक्यात खाली पाडतो.
हत्तीच्या समोर जाऊन स्टाईल मारणं तरुणीला चांगलंच महागात पडलं. पुढच्याच क्षणी हत्तीनं तिला खाली लोळवलं. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच वहायरल होतोय. या घटनेनंतर तरुणी कोणत्याही प्राण्याच्या जवळ जायला दहा वेळा विचार करेल.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी प्राणी पाहण्यासाठी गेली आहे. तिला हत्ती दिसतो आणि ती त्याच्याजवळ जाते. हत्ती आरामात त्याचं अन्न खात असतो आणि तरुणी त्याच्या जवळ जाऊन उभी राहते. मग काय हत्तीला राग येतो आणि तो सोंडेनं तिला एक झटका देतो. एक सोंडेच्या हल्ल्यातच ती खाली कोसळते आणि तिला कमरेच्या खाली लागतंही. ती हात मागे ठेवून पळते.
advertisement
@PicturesFoIder नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा 26 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून काहींनी तरुणीनं केलेल्या कृत्यासाठी संताप व्यक्त केलाय. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणा आहे हे स्पष्ट झालं नाही मात्र इंटरनेटवर चांगलीच खळबळ माजवतोय.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : हत्तीसमोर मारत होती स्टाईल, पुढच्याच क्षणी तरुणीला उचलून फेकलं
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement