advertisement

Kalyan : टवाळखोरांचे धाबे दणाणले, महिलांच्या सुरक्षेसाठी कल्याण पोलीसांची धडाकेबाज मोहीम

Last Updated:

Kalyan News : कल्याणमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी लक्ष द्या खास करुन ही बातमी प्रत्येक महिलेसाठी आहे. आता तुमच्या मदतीसाठी पोलिस धावून येणार आहे.

Action against eve-teasers in Kalyan public places
Action against eve-teasers in Kalyan public places
कल्याण : भारतात महिलांच्या बाबतची होणाऱ्या गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वारंवार कुठे ना कुठे महिलांची छेड काढण्याच्या घटना समोर येत असतात. मात्र राज्यातील कल्याण या शहरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा उपक्रम राबवण्यात आलेला होता.
शाळा-कॉलेज परिसरात पोलिसांची करडी नजर
कल्याण शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक गर्दीची ठिकाणे, मॉल, उद्याने, बगीचे, तसेच शाळा-कॉलेज परिसर आणि निर्जन भागात महिलांची छेडछाड करणाऱ्या एकूण 1,013 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत दामिनी पथकाने विशेष लक्ष ठेवून संशयितांवर नजर ठेवली आणि तक्रारींची तत्काळ दखल घेतली.
advertisement
जानेवारी महिन्यापासून चुकीचे वर्तन करणाऱ्या 62 जणांवर थेट कारवाई करण्यात आली. तसेच गुन्ह्यासाठी चिथावणी देणाऱ्या 481 जणांवर आणि महिलांशी लगट करण्याचा किंवा छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 470 जणांविरोधात कठोर पावले उचलण्यात आली. ही माहिती परिमंडळ 3 चे उपायुक्त यांनी दिली.
शहरात दामिनी पथकाची कडक नजर
उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक सतत गस्त घालत असून महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे. कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांनी कोणतीही भीती न बाळगता मदत मागावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
advertisement
advertisement
कोणतीही तक्रार असल्यास 'या' नंबरवर तात्काळ कळवा
कोणतीही अडचण आल्यास त्वरित 112 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले. महिलांनी न घाबरता तक्रार केल्यास पोलिसांकडून त्वरित मदत केली जाईल असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan : टवाळखोरांचे धाबे दणाणले, महिलांच्या सुरक्षेसाठी कल्याण पोलीसांची धडाकेबाज मोहीम
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement