मुलाला स्कूल बसपर्यंत सोडायला गेली व्यक्ती, गायीने पायाखाली तुडवलं; भयानक VIDEO

Last Updated:

गाईने व्यक्तीवर केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

फोटो - सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब
फोटो - सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब
नवी दिल्ली :  प्राण्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या कितीतरी घटना घडत असतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला. जो खूप भयानक आहे. एका गायीने एका व्यक्तीला तुडवलं आहे. या व्यक्तीचा मृत्यू झाला. दिल्लीतील ही धक्कादायक घटना आहे. ज्याचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.
दक्षिण दिल्लीतील देवली रोडजवळील ही घटना आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती आपल्या मुलाला स्कूल बसपर्यंत सोडायला जात होती. त्यावेळी या व्यक्तीवर एका गाईने हल्ला केला. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूने एक व्यक्ती धावत येते. त्याच्यामागून एक गाय येते. गाय व्यक्तीला टक्कर देते आणि खाली पाडते. त्यानंतर आपल्या पायाखाली तुडवते. व्यक्ती रस्त्यातच पडून राहते. काही वेळ गाय बाजूला होते. लोक त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून येतात. एक तरुण पुढे येत त्या व्यक्तीला खेचत नेतो. इतक्यात गाईचं लक्ष जातं आणि ती पुन्हा त्या व्यक्तीवर हल्ला करू लागते. तेव्हा लोक त्या गाईला हाकलण्याचा प्रयत्न करतात. पण गाय त्या व्यक्तीला मारत राहते.
advertisement
व्हिडीओतच या व्यक्तीची अवस्था भयंकर झाल्याचं दिसतं आहे. त्याला वाचवण्यासाठी धडपड करण्यात आली पण या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
नंदूरबारमध्येही घडली होती अशी घटना
जिल्ह्यातील तळोदा शहरातहीएका 66 वर्षीय वृद्ध व्य़क्तीवर गाईने हल्ला केला होता. गणपती गल्ली परिसरातील रहिवासी असलेले 66 वर्षीय दिगंबर गुलाबराव सोनार हे आपल्या दुकानावर जात होते. रस्त्यात उभ्या असलेल्या मोकाट गाईपैकी एका गाईने त्यांच्यावर अचानक हल्ला करत त्यांना शिंगावर उचलून फेकून दिले. त्यामुळे दिगंबर सोनार हे गंभीर प्रमाणावर जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताच्या खांदा जायबंदी झाला आणि डोकंसुद्धा फुटलं होतं. सोनार मोठ्याने ओरडल्याने लोक मदतीसाठी धावून आले. त्यांनी दिगंबर सोनार यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
view comments
मराठी बातम्या/Viral/
मुलाला स्कूल बसपर्यंत सोडायला गेली व्यक्ती, गायीने पायाखाली तुडवलं; भयानक VIDEO
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement