Mumbai News : दिल्लीनंतर मुंबई टार्गेटवर? हल्ल्याचा कट सुरू असल्याचा संशय, सर्व यंत्रणांना अलर्ट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दिल्लीनंतर आता मुंबई हल्लेखोरांच्या टार्गेटवर आहे. कारण मुंबईत हल्ला करण्याचा कट सूरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे.त्यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत.
Mumbai News : प्रशांत बंग, प्रतिनिधी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेतायत,त्याचसोबत जाहीर सभांचा देखील धडाका लावला जात आहे. त्यामुळे शहरात निवडणुकीची धामधुम असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीनंतर आता मुंबई हल्लेखोरांच्या टार्गेटवर आहे. कारण मुंबईत हल्ला करण्याचा कट सूरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे.त्यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत.
advertisement
मुंबईत महापालिका निवडणुकीची धुम असताना मुंबईमध्ये नियोजित हल्ला होणार असल्याचा संशय काही मोठ्या यंत्रणांना आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सुरक्षा एजन्सींना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काश्मीर किंवा महाराष्ट्रातून स्फोटकांसह आयएसआय समर्थित हल्ल्याची योजना सुरू असल्याचा संशय आहे. सुरक्षा यंत्रणांना जारी केलेल्या पत्रात याबाबतचा उल्लेख आहे.त्यामुळे विमानतळे आणि संवेदनशील प्रतिष्ठानांची सुरक्षा करणाऱ्या एजन्सींनाही हीच सूचना देण्यात आली आहे. तसेच सर्व सुरक्षा एजन्सींना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आणि संवेदनशील ठिकाणांवर आता यंत्रणांची करडी नजर असणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 11:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : दिल्लीनंतर मुंबई टार्गेटवर? हल्ल्याचा कट सुरू असल्याचा संशय, सर्व यंत्रणांना अलर्ट











