1 बॉलमध्ये हव्या होत्या 4 रन... 19 वर्षांच्या खेळाडूने मारला असा शॉट, पाहून जग हैराण, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉर्चर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात थरारक सामना पार पडला, ज्याचा निकाल शेवटच्या बॉलवर लागला.
मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉर्चर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात थरारक सामना पार पडला, ज्याचा निकाल शेवटच्या बॉलवर लागला. 19 वर्षांच्या ऑलिव्हर पीकेने शेवटच्या बॉलवर सिक्स मारून त्याची टीम मेलबर्न रेनेगेड्सला विजय मिळवून दिला.
ऑलिव्हर पीकेला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने 30 बॉलमध्ये नाबाद 42 रन करून मेलबर्न रेनेगेड्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या डावात त्याने एक सिक्स आणि चार फोर मारले, शेवटचा बॉलवर मेलबर्नला विजयासाठी 4 रनची आवश्यकता होती.
आरोन हार्डीने पर्थ स्कॉर्चर्ससाठी शेवटची ओव्हर टाकली. जिंकण्यासाठी एका बॉलवर चार रन हव्या होत्या. अशा परिस्थितीत सर्वोत्तम बॅटरही घाबरतात. अशा परिस्थितीत ऑलिव्हर पीकेने जे केलं ते कोणताही बॅटर करणार नाही. ऑलिव्हर पीकेने वाइड जाऊन फाइन लेगवर शॉट मारला. जे खूपच धोकादायक होते, पण सुदैवाने बॉलचा बॅटला चांगला स्पर्श झाला बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला, त्यामुळे मेलबर्नला सिक्स रन मिळाल्या आणि त्यांनी 4 विकेटने सामना जिंकला.
advertisement
OLI PEAKE!! He hits a SIX to win the game off the final ball! #BBL15 pic.twitter.com/2jZ2lFecdg
— KFC Big Bash League (@BBL) January 7, 2026
पर्थ स्कॉर्चर्स 127 रनवर ऑलआऊट
टॉस गमावल्यानंतर पहिले बॅटिंग करताना पर्थ स्कॉर्चर्सची सुरूवात खराब झाली. त्यांनी 49 रनवर 3 विकेट गमावल्या. पर्थकडून एरॉन हार्डीने सर्वाधिक 44 रन केल्या, तर 5 बॅटर दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. मेलबर्न रेनेगेड्सकडून गुरिंदर संधूने 4 ओव्हरमध्ये 28 रन देऊन सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. हसन खानने 2, तर विल सदरलँड आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
advertisement
मेलबर्न रेनेगेड्सचा हा तिसरा विजय आहे. 6 गुणांसह, त्यांची बिग बॅश लीग पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. पर्थ स्कॉर्चर्सचा हा तिसरा पराभव आहे. 8 गुणांसह, त्यांची टीम टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 11:28 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
1 बॉलमध्ये हव्या होत्या 4 रन... 19 वर्षांच्या खेळाडूने मारला असा शॉट, पाहून जग हैराण, Video











