Pune News : पुण्यात निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना नेत्याच्या वाहनावर हल्ला, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सध्या सर्वच डोअर डोअर मतदांना भेटतायात, रॅली काढताय आणि जाहीर सभा घेत आहेत.असे असताना पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शिवसेनेच्या एका नेत्याच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
Pune news : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सध्या सर्वच डोअर डोअर मतदांना भेटतायात, रॅली काढताय आणि जाहीर सभा घेत आहेत.असे असताना पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शिवसेनेच्या एका नेत्याच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सूरू करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
advertisement
पुणे महापालिका निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्षांनी प्रचारांचा धडाका सूरू केला आहे.त्यामुळे जिल्ह्यात निवडणुकीची धामधुम असताना तिकडे शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. य़ा घटनेत नाना भानगिरे सारीका ताईला या हल्ल्यात लागल्याचे सांगताना दिसत आहेत. तसेच जाणूनबुजून दगड मारल्याचे देखील नाना भानगिरे हे पोलिसांना सांगताना दिसत आहेत.तसेच या हल्ल्यात भानगिरे यांच्या गाडीची पुढची काच देखील डॅमेज झाली आहे.
advertisement
या घटनेनंतर नाना भानगिरे हे प्रचंड आक्रामक झाले असून लवकरात लवकर संबंधितांना ताब्यात घ्या नाही तर मी पोस्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसेन. तसेच कोण आहे त्याला अटक करा नाही तर माझ्या ताब्यात तरी द्या,असे नाना भानगिरे पोलिसांना सांगताना देखील दिसत आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासायला घेतले आहे.या तपासातून पोलिसांच्या हाती काय सुगावा लागतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 11:17 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुण्यात निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना नेत्याच्या वाहनावर हल्ला, नेमकं काय घडलं?











