तेजश्रीने गोरेगाव सोडल्याचं दु:ख सांगितलं; फडणवीसांनी दिलं असं उत्तर की अभिनेत्रीचा चेहराच खुलला
- Published by:Devika Shinde
Last Updated:
नुकत्याच झालेल्या 'आपलं ठाणे आपला देवाभाऊ' या कार्यक्रमात तेजश्रीने आपलं हे दु:ख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलं. मात्र, त्यावर फडणवीसांनी जी उत्तरे दिली आणि भविष्यातील ठाण्याचा जो 'प्लॅन' सांगितला, ते ऐकून तेजश्रीचा चेहरा आनंदाने खुलला.
मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमधील प्रवासाचं अंतर हे केवळ किलोमीटरमध्ये मोजलं जात नाही, तर ते 'ट्रॅफिक'मध्ये मोजलं जातं. हीच ट्रॅफिकची डोकेदुखी सहन न झाल्याने मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिचं गोरेगावमधील घर सोडून ठाण्यात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या 'आपलं ठाणे आपला देवाभाऊ' या कार्यक्रमात तेजश्रीने आपलं हे दु:ख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलं. मात्र, त्यावर फडणवीसांनी जी उत्तरे दिली आणि भविष्यातील ठाण्याचा जो 'प्लॅन' सांगितला, ते ऐकून तेजश्रीचा चेहरा आनंदाने खुलला.
advertisement
advertisement
मुंबईकरांचा आणि ठाणेकरांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लोकल ट्रेनची गर्दी आणि उकाडा. यावर फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले, "आता आम्ही लोकल ट्रेनला देखील मेट्रोसारखे बंद दरवाजा असलेले वातानुकूलित (AC) डब्बे देणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या एसी लोकलचा खर्च नॉर्मल लोकलसारखाच राहणार आहे. एसी प्रवासासाठी आम्ही तिकीट दर वाढवणार नाही. 'वन टॅग वन तिकीट' या योजनेमुळे तुम्ही संपूर्ण एमएमआर क्षेत्रात एकाच तिकिटावर फिरू शकाल."
advertisement
तेजश्रीने गोरेगाव सोडल्याचं कारण सांगताना प्रवासाचा वेळ हा महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी दोन मोठ्या प्रकल्पांची माहिती दिली. पहिलं म्हणजे ठाणे-बोरिवली ट्विन टनेल, ज्यामुळे 23 किलोमीटरचं अंतर थेट 15 किलोमीटरने कमी होणार आहे. हा बोगदा ठाणे आणि बोरिवलीला जोडणार आहे. यामुळे जो प्रवास करायला 2 तास लागतात, तो आता फक्त 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होईल.
advertisement
advertisement










