Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवस वाहतुकीत बदल, कुठे किती वेळ रस्ता बंद?

Last Updated:

Samruddhi Highway: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्ग
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अमरावती जिल्ह्यातील महामार्गाच्या पट्ट्यात ९ जानेवारी ते १३ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत वाहतूक तात्पुरती थांबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम एकूण १० टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या कि.मी. ९०+५०० ते कि.मी. १५०+३०० या दरम्यान ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे.
या कामाच्या प्रत्येक टप्प्यादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवली जाईल. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर त्या वाहिनीवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या तांत्रिक कामामुळे प्रवाशांचा काही काळ खोळंबा होण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेनुसार करावे आणि महामार्गावरील कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement

मुंबई ते नागपूर, समृद्धी महामार्ग

मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या ११ तासांत पार करता येतो. समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडत असून महाराष्ट्राच्या अर्थकारणावर या महामार्गामुळे मोठा परिणाम झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवस वाहतुकीत बदल, कुठे किती वेळ रस्ता बंद?
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement