Pune: रोजंदारीवर काम करणारी माऊली, पोटाच्या दुखण्याने होती त्रस्त; सोनोग्रॉफी पाहून डॉक्टर हैराण, अखेर...
- Published by:Sachin S
Last Updated:
या महिलेला ओम हॉस्पिटल पारगाव इथं दाखलं व्हावं लागलं. त्यानंतर तिच्या पोटाची सोनोग्राफी करण्यात आली.
सचिन तोडकर, प्रतिनिधी
आंबेगाव : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणारी घटना घडली आहे. एका महिलेच्या पोटातून तब्बल साडे तीन किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या या महिलेची मागील अनेक दिवसांपासून होत असलेल्या त्रासातून डॉक्टरांनी अखेरीस सुटका केली आहे. डॉक्टरांच्या टीमचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
advertisement
पारगाव इथं ओम हॉस्पिटलमध्ये प्रथमच ग्रामीण भागात गुंता गुंतीची शस्रक्रिया पार पडली आहे. डॉ. शिवाजी थिटे यांच्या ओम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्रक्रिया करण्यात आली. तब्ब्ल दोन तास चाललेल्या या शस्रक्रियेत महिला रुग्णाच्या पोटातून साडेतीन किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आलं. रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलेला डॉक्टरांनी पुनर्जन्म दिला असल्याची भावना नातेवाईकांनी वेळी व्यक्त केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला रोजंदारीच्या कामावर जात होती. गेली सहा महिन्यापासून तिच्या पोटात दुखू लागल्याने तात्पुरत्या स्वरूपात औषधं उपचार घेऊन चाल ढकल करत होती. मात्र, मागील पंधरा दिवसात महिलेच्या पोटात अचानक प्रचंड वेदना होऊ लागल्या आणि या महिलेला ओम हॉस्पिटल पारगाव इथं दाखलं व्हावं लागलं. त्यानंतर तिच्या पोटाची सोनोग्राफी करण्यात आली.
advertisement
सोनोग्राफी रिपोर्टमध्ये पोटात मोठ्या स्वरूपाची गाठ असल्याचं निदर्शनास आले. त्यामुळे सर्जन डॉ.नरेंद्र लोहकरे यांनी तात्काळ शस्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. सदर महिलेच्या पोटाची ओम हॉस्पिटलमध्ये डॉ. लोहकरे, डॉ. शिवाजी थिटे आणि टीमने यशस्वीरित्या शस्रक्रिया पार पाडली. ही शस्रक्रिया अत्यल्प दरात केल्यानं माहिलेच्या कुटुंबियांनी ओम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ.शिवाजी थिटे आणि टीमचे आभार मानले. या यशस्वी शस्रक्रियेचं मेडिकल क्षेत्रात कौतुक केले जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 9:54 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: रोजंदारीवर काम करणारी माऊली, पोटाच्या दुखण्याने होती त्रस्त; सोनोग्रॉफी पाहून डॉक्टर हैराण, अखेर...










