T20 World Cup आधी पाकिस्तानचा धमाका, 100 बॉलमध्ये मॅच जिंकली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वर्ल्ड कपला महिना उरला असताना पाकिस्तानने मोठा धमाका केला आहे. पाकिस्तानने 100 बॉल जिंकली आहे. पाकिस्तानचा हा पराक्रम पाहून इतर संघाच टेन्शन वाढलं आहे.
Pakistan beat sri lanka : टी20 वर्ल्ड कप 2026 सूरू व्हायला आता महिन्याभराचा कालावधी उरला आहे. या कालावधीत सर्वत संघ आपआपली ताकद तपासताना दिसत आहेत. अशात आता वर्ल्ड कपला महिना उरला असताना पाकिस्तानने मोठा धमाका केला आहे. पाकिस्तानने 100 बॉल जिंकली आहे. पाकिस्तानचा हा पराक्रम पाहून इतर संघाच टेन्शन वाढलं आहे.
खरं तर टी 20 वर्ल्ड कपआधी पाकिस्तान साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यातील पहिल्याच टी20 सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे. खरं तर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 128 धावा केल्या होत्या.
advertisement
पाकिस्तानने या 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सूरूवात केली होती. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि सायम अयुबने पाकिस्तानच्या डावाला चांगली सूरूवात करून दिली. साहिबजादा फरहान 51 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर सायम अयुबने 24 धावा केल्या. या सलमान आगाने 16 आणि शादाब खानने 18 धावांची खेळी केली होती. या धावांच्या बळावर पाकिस्ताने हे लक्ष्य 16.4 ओव्हर म्हणजेच 100 बॉलमध्ये गाठत हा सामना 6 विकेटसने जिंकला होता.
advertisement
पाकिस्तानने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात श्रीलंकेकडून महेश तीक्ष्णा, दुश्मांत चमीरा, वानिंदू हसरंगा आणि धनंजया सिल्वा याने प्रत्येकी एक एक विकेट घेतली आहे.
advertisement
तसेच प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव 128 धावांवर ऑल आऊट झाला होता. श्रीलंकेकडून जनिथ लियानागेने सर्वाधक 40 धावांची खेळी केली होती.त्याच्या व्यतिरिक्त इतर खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या. दरम्यान पाकिस्तानकडून सलमान मिर्झाने 3, वसिम आणि शादाब खानने प्रत्येकी 2 विकेट घेतले होते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 10:51 PM IST









