IND vs NZ : वनडे सीरिजआधी आली गुड न्यूज, स्टार खेळाडूची शेवटच्या क्षणी टीम इंडियात एन्ट्री!

Last Updated:

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वनडे सीरिजला रविवार 11 जानेवारीपासून सुरूवात होत आहे, त्याआधी टीम इंडियाला गुड न्यूज मिळाली आहे.

वनडे सीरिजआधी आली गुड न्यूज, स्टार खेळाडूची शेवटच्या क्षणी टीम इंडियात एन्ट्री!
वनडे सीरिजआधी आली गुड न्यूज, स्टार खेळाडूची शेवटच्या क्षणी टीम इंडियात एन्ट्री!
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वनडे सीरिजला रविवार 11 जानेवारीपासून सुरूवात होत आहे, त्याआधी टीम इंडियाला गुड न्यूज मिळाली आहे. भारताच्या वनडे टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) कडून फिटनेस क्लिअरन्स मिळाला आहे. त्याची निवड भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजसाठी करण्यात आली आहे, पण यासाठी अट ठेवण्यात आली होती.
2025-26 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय परतल्यानंतरच श्रेयस अय्यरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळेल अशी अट घालण्यात आली होती. विजय हजारे ट्रॉफीमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करताना, श्रेयसने हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात मुंबईचे नेतृत्व केले आणि 53 बॉलमध्ये 82 रन केल्या.

श्रेयस अय्यरला ग्रीन सिग्नल

बीसीसीआयला खात्री करायची होती की श्रेयस अय्यरचे शरीर स्पर्धात्मक क्रिकेटचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो 8 जानेवारी रोजी पंजाबविरुद्ध विजय हजारे ट्रॉफीमध्ये आणखी एक मॅच खेळण्याची अपेक्षा होती, जी त्याची शेवटची चाचणी मानली जात होती. पण, सीओई मेडिकल टीम त्याच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे दिसून येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीओईचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना पत्र लिहून कळवले आहे की, श्रेयस अय्यर भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजसाठी उपलब्ध आहे. श्रेयस अय्यरला खेळण्याची परवानगी मिळाल्याने, महाराष्ट्राचा बॅटर ऋतुराज गायकवाडला न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार नाही. श्रेयस अनुपलब्ध असल्यास ऋतुराजचा पर्याय म्हणून विचार केला जाणार होता.
advertisement

भारतीय खेळाडू बडोद्याला पोहोचले

टीम इंडियाचे अनेक खेळाडू आधीच बडोद्याला पोहोचले आहेत, जिथे 7 जानेवारीपासून प्रशिक्षण शिबिर सुरू होणार होते. पहिला वनडे सामना 11 जानेवारी रोजी खेळला जाईल, ज्यामुळे श्रेयसला टीममध्ये सामील होण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. विजय हजारे ट्रॉफीच्या लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात ऋषभ पंत दिल्लीकडूनही खेळेल.

भारताची वनडे टीम

advertisement
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (विकेट कीपर), श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : वनडे सीरिजआधी आली गुड न्यूज, स्टार खेळाडूची शेवटच्या क्षणी टीम इंडियात एन्ट्री!
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement