Viral Video : क्रिकेटच्या मैदानात घुसून बैलाची दहशत, अचानक आला आणि केला हल्ला
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
रस्त्यांवर अनेक भटके प्राणी फिरत असतात. भटक्या प्राण्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून ते कधी हल्ला करतील सांगता येत नाही. त्यामुळे रस्त्यावरुन चालताना लोकांच्या मनात भटक्या प्राण्यांची भीती बसलीय.
नवी दिल्ली: रस्त्यांवर अनेक भटके प्राणी फिरत असतात. भटक्या प्राण्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून ते कधी हल्ला करतील सांगता येत नाही. त्यामुळे रस्त्यावरुन चालताना लोकांच्या मनात भटक्या प्राण्यांची भीती बसलीय. भटक्या प्राण्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. यामध्ये आणखी भर पडली असून भटक्या बैलाच्या हल्ल्याची घटना समोर आलीय. क्रिकेट मैदानात अचानक भटका बैल घुसतो आणि दहशत माजवतो.
क्रिकेट मॅच सुरु असताना अचानक एक बैल येतो आणि तरुणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या दहशतीमुळे तरुण सैरभैर पळू लागतात. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकल क्रिकेट टुर्नामेंट सुरु आहे आणि दोन टीम मैदानावर खेळत आहे. हा सामना पाहण्यासाठी बरीच गर्दीही जमलीय. या गर्दीतून अचानक एक भटका बैल मैदानाच्या दिशेने येतो. त्याला पाहून काही तरुण घाबरतात आणि दूर जाऊ लागताच तोच तो त्यांच्या मागे धावतो.
advertisement
बैलाच्या हल्ल्यामुळे सगळेच तरुण सैरभैर धावू लागतात. बैलही तरुणांच्या मागे इकडे तिकडे जातो. बैलाच्या दहशतीमुळे टुर्नामेंट काही काळासाठी थांबते. भटक्या प्राण्यांची दहशत पुन्हा एकदा या व्हिडीओमधून दिसून आली.
When the bulls want to play cricket pic.twitter.com/SkrM9lbpzU
— Sameer Allana (@HitmanCricket) February 19, 2024
advertisement
@HitmanCricket नानाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 22 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवताना दिसून आला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येत आहेत. आजकाल सोशल मीडियावर अशा भटक्या प्राण्यांचे खूप धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2024 4:45 PM IST











