TRENDING:

धक्कादायक! दुकानदार एकटा पाहिला अन् उपसले कोयते; पुण्यात भरदिवसा साडेपाच मिनिटांत लाखोंचा 'गेम'

Last Updated:

जेव्हा दुकानाचे मालक एकटेच उपस्थित होते, तेव्हा चार तरुण हातात लांब आणि धारदार कोयते घेऊन दुकानात घुसले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली. पुण्यातील मांजरी परिसरात दिवसाढवळ्या भरबाजारात पडलेल्या दरोड्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथे 'महावीर ज्वेलर्स' या सराफा दुकानावर चार सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला चढवत लाखो रुपयांचे दागिने लंपास केले.
पुण्यात भरदिवसा दरोडा (AI Image)
पुण्यात भरदिवसा दरोडा (AI Image)
advertisement

ही घटना काल (शनिवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. जेव्हा दुकानाचे मालक एकटेच उपस्थित होते, तेव्हा चार तरुण हातात लांब आणि धारदार कोयते घेऊन दुकानात घुसले. मालक एकटे असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवला. "जर आरडाओरडा केला तर जागच्या जागी संपवून टाकू," अशी धमकी देत दरोडेखोरांनी दुकानातील दागिन्यांची लूट सुरू केली.

advertisement

दरोडेखोरांच्या हातात जीवघेणी हत्यारे असल्याने घाबरलेले सराफ मालक प्रतिकार करू शकले नाहीत. अवघ्या काही मिनिटांत दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचे दागिने पिशव्यांमध्ये भरले आणि दुचाकीवरून वेगाने पसार झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा सर्व थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली असून अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, तुरीचे वाढले भाव, सोयाबीनची काय स्थिती? Video
सर्व पहा

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. दरोडेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या मार्गावरील इतर सीसीटीव्ही फुटेजही पोलीस खंगाळत आहेत. दरम्यान, भरवस्तीत आणि मुख्य महामार्गालगत असलेल्या दुकानावर अशा प्रकारे सशस्त्र दरोडा पडल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! दुकानदार एकटा पाहिला अन् उपसले कोयते; पुण्यात भरदिवसा साडेपाच मिनिटांत लाखोंचा 'गेम'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल