पुणे : मावळ तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. तब्बल 25 वर्षांपासून पंचायत समितीवर फडकणारा भाजपचा झेंडा खाली उतरवत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर तसेच पंचायत समितीच्या दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत भाजपचा तालुक्यातील प्रभाव पूर्णतः संपुष्टात आणल्याचे चित्र दिसून येत आहे. या विजयामागे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाची निर्णायक भूमिका असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. या निवडणुकीत आमदार सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांच्यात थेट लढत रंगली होती. मात्र निकालात भाजपला मोठा धक्का बसला असून पक्षाला पूर्णतः अपयशाचा सामना करावा लागला आहे.
advertisement
राष्ट्रवादीने करून दाखवलं
विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार न करण्याचा निर्णय घेतला असतानाही सहानुभूतीची लाट पक्षाच्या बाजूने गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या सर्व पाच गटांसह पंचायत समितीवरही निर्विवाद सत्ता मिळवत पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे.
24 वर्ष भाजप मावळ पंचायत समिती वर आपली भक्कम पकड
मावळात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस थेट सामना पाहायला मिळत आहे. गेले 25 वर्ष सलग मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता राहिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मावळावर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे सलग दोन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा धक्का देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी यंदा उलट फेर करण्याचा चंग बांधला होता. भाजपची सत्ता राहिली त्यानंतर मागील चार वर्षात पंचायत समितीच्या निवडणुकांचा कारभार हा प्रशासकाच्या हाती राहिला त्यात काळातही पंचायत समितीवर भाजपाचाच वर चष्मा असल्याचे पाहायला मिळालं त्यामुळे आत्तापर्यंत जवळपास 24 वर्ष भाजप मावळ पंचायत समिती वर आपली भक्कम पकड होती
