बोरवेल खोदण्यापूर्वी आता 'या' विभागाची परवानगी अनिवार्य
यापूर्वी केवळ बांधकाम परवानगी घेऊन बोरवेल खोदली जात असे. मात्र, आता मेट्रो बोगद्याच्या वर किंवा आसपास बोरवेल खोदण्यासाठी भूजल विभागाची स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक असेल. शुक्रवार पेठेतील घटनेत घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशा चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रशासन पावले उचलत आहे.
advertisement
पुनर्बांधणी होणार कठीण?
पुण्यातील पेठांचा भाग अत्यंत दाटीवाटीचा असून येथे अनेक जुन्या वाड्यांचा पुनर्विकास सुरू आहे. मेट्रोचा बोगदा जमिनीखाली सुमारे १०० फूट खोल असला तरी, बांधकामादरम्यान होणारं खोदकाम मेट्रोच्या काँक्रिट आवरणाला इजा पोहचवू शकते. नवीन नियमावलीनुसार आता घरमालकांना मेट्रो प्रशासनाकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) घ्यावे लागेल.स्ट्रक्चरल ऑडिट आणि तांत्रिक सुरक्षिततेचा अहवाल सादर करावा लागेल. बांधकामादरम्यान मेट्रोच्या तांत्रिक पथकाची देखरेख असणे आवश्यक असू शकते.
शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे भूमिगत असल्याने त्यावरील प्रत्येक बांधकामावर आता महापालिका आणि महामेट्रोची करडी नजर असणार आहे. यामुळे पेठांमधील जुन्या वाड्यांच्या मालकांना आणि विकसकांना आता अधिक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
