TRENDING:

पुण्यातील सुनसान रस्ते, एकट्या महिलांचा करायचा पाठलाग अन्...; पोलिसांनी 245 फुटेज तपासले, शेवटी...

Last Updated:

तो रात्रीच्या वेळी दुचाकीवरून फिरत असे. सुनसान रस्ते किंवा अंधार असलेल्या ठिकाणी त्याला एकटी महिला किंवा मुलगी दिसल्यास तो त्यांना लक्ष्य करायचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर एकट्या महिलांना गाठून त्यांची छेड काढणाऱ्या एका सराईत आणि विकृत गुन्हेगाराला अखेर विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून तो पुणे पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल २४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याची मोठी मोहीम राबवली. सागर राम सोनवणे (वय २२, रा. भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तरुणाला अटक (AI Image)
तरुणाला अटक (AI Image)
advertisement

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव येथील गणेश पार्क परिसरात नुकताच एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला होता. एका दुचाकीस्वार अज्ञात तरुणाने एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात महिला आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५ सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

advertisement

या गंभीर गुन्ह्याची नोंद घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी आरोपीला तात्काळ पकडण्याचे आदेश दिले. आरोपीबद्दल कोणतीही ठोस माहिती नसताना, तपास पथकाने तातडीने विमाननगर, विश्रांतवाडी, दिघी आणि भोसरी या विस्तृत परिसरातील २४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत पोलिसांनी आरोपीचा छडा लावला आणि सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने अटक केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आरोग्यासाठी टॉनिक, वजन कमी करायला होईल मदत,बडीशेप खाण्याचे हे फायदे माहितीये का?
सर्व पहा

पोलिसांनी आरोपी सागर सोनवणेला अटक केल्यानंतर त्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती आणि त्याची पद्धत समोर आली, ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेले. पोलीस तपासात आरोपी सागर सोनवणे याची गुन्हे करण्याची पद्धत समोर आली आहे. तो रात्रीच्या वेळी दुचाकीवरून फिरत असे. सुनसान रस्ते किंवा अंधार असलेल्या ठिकाणी त्याला एकटी महिला किंवा मुलगी दिसल्यास तो त्यांना लक्ष्य करायचा. तो पीडितेचा विनयभंग करून वेगाने घटनास्थळावरून पळून जात असे. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तो जाणीवपूर्वक सीसीटीव्ही नसलेले रस्ते आणि आडवाटांचा वापर करत असे. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत सागर सोनवणे याने केवळ विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत ५ वेळा विनयभंग केल्याची कबुली दिली आहे. याव्यतिरिक्त, त्याने पुणे शहरातील इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही अशाच पद्धतीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील सुनसान रस्ते, एकट्या महिलांचा करायचा पाठलाग अन्...; पोलिसांनी 245 फुटेज तपासले, शेवटी...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल