Health Tips : आरोग्यासाठी नैसर्गिक टॉनिक, वजन कमी करायला होईल मदत, बडीशेप खाण्याचे हे फायदे माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
जेवणानंतर तोंडाला सुगंध देण्यासाठी वापरली जाणारी ही छोटीशी दाणे असलेली बडीशेप, खरेतर संपूर्ण आरोग्यासाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे.
छत्रपती संभाजीनगर : आज वाढतं वजन अनेकांसाठी चिंता बनलं आहे. कामाचा ताण, अनियमित आहार आणि बसून राहण्याची सवय या सगळ्यांमुळे वजन नियंत्रणाबाहेर जातं. वजन कमी करण्यासाठी जिम, डाएटिंग अशा अनेक गोष्टी आपण करतो. पण कधी कधी आपल्या घरातील अगदी साध्या वस्तूंमध्येही प्रचंड आरोग्यदायी गुण लपलेले असतात. त्यापैकीच एक म्हणजे बडीशेप. जेवणानंतर तोंडाला सुगंध देण्यासाठी वापरली जाणारी ही छोटीशी दाणे असलेली बडीशेप, खरेतर संपूर्ण आरोग्यासाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे. विशेषतः वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते.
बडीशेप वजन कमी करण्यात कशी मदत करते?
बडीशेपमधील नैसर्गिक तेलं आणि कंपाउंड्स शरीराला ऊर्जा वापरण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे फॅट बर्निंगची प्रक्रिया अधिक वेगाने होते. पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. फायबरयुक्त असल्यामुळे बडीशेप भूक नियंत्रणात ठेवते. वारंवार खाण्याची इच्छा कमी होते आणि कॅलरीज कमी प्रमाणात घेतल्या जातात. पचन सुधारते आणि गॅस-फुगवटा कमी करते. बडीशेपमध्ये असलेली एंझाइम्स पचनक्रिया सुधारतात. पोट हलकं राहिलं की संपूर्ण शरीराचा मेटाबॉलिक बॅलन्स सुधारतो आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते.
advertisement
अतिरिक्त पाणी बाहेर टाकते. बडीशेपचे हलके मूत्रल गुणधर्म शरीरातील वॉटर रिटेंशन कमी करतात. त्यामुळे सूज कमी होते आणि शरीर सडपातळ वाटते. विषारी पदार्थ बाहेर काढते. बडीशेप शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत करते. शरीर स्वच्छ राहिल्यास फॅट स्टोअर होण्याची शक्यता कमी होते. रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवते. ब्लड शुगर अचानक वाढणे-घटणे ही चरबी वाढण्यामागची मोठी समस्या आहे. बडीशेप हा बदल नियंत्रित ठेवते, ज्यामुळे क्रेविंग्स कमी होतात.
advertisement
हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत
विशेषतः महिलांसाठी बडीशेप उपयुक्त मानली जाते कारण तिच्या काही नैसर्गिक गुणधर्मांमुळे हार्मोनल बॅलन्स सुधारतो आणि हार्मोन्स संतुलित राहिल्यास वजन नियंत्रणात राहणं सोपं होतं.
बडीशेपचा वापर कसा करावा?
जेवणानंतर बडीशेप चघळणे पचन सुधारतं आणि भूक कमी होते. हा सर्वात सोपा उपाय. एक चमचा बडीशेप 10 मिनिटे पाण्यात उकळा. हे कोमट पाणी दिवसातून एकदा प्यायला सुरुवात करा. रात्री एक चमचा बडीशेप पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. शरीराचं डिटॉक्सिफिकेशन यामुळे चांगलं होतं. बडीशेप आणि जिरे यांची चहा एकत्र उकळून घेतलेलं हे पाणी पचनासाठी आणि फॅट बर्निंगसाठी जास्त प्रभावी मानलं जातं.
advertisement
स्मूदी किंवा डिटॉक्स वॉटरमध्ये बडीशेप
काकडी, पुदीना किंवा कोमट पाण्यासोबत बडीशेप घालून ते दिवसभर पिऊ शकता. बडीशेप भाजून पावडर बनवा आणि सकाळी कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा घ्या.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
December 12, 2025 4:07 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : आरोग्यासाठी नैसर्गिक टॉनिक, वजन कमी करायला होईल मदत, बडीशेप खाण्याचे हे फायदे माहितीये का?










