शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरकडून पुण्याच्या दिशेने आलेल्या कंटेनरने सर्वप्रथम तेजस विलास पंदरकर आणि मयूर विलास पंदरकर यांच्या पिकअपला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे पिकअप रस्त्यावर उलटली. अपघातग्रस्त पिकअपला धडक दिल्यानंतरही कंटेनर चालकाने नियंत्रण मिळवले नाही. भरधाव कंटेनरने पुढे असलेल्या एका कारला धडक दिली. कारला धडकल्यानंतर कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन दुचाकींना चिरडत थेट एका दुकानात घुसला. या दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या चंद्रकला संदीप मुळे (वय ६५, रा. केज, जि. बीड) या महिलेला कंटेनरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
विश्वास ठेवला पण घात झाला! लघुशंकेसाठी गेला सराफ; विश्वासू कामगाराने केलं धक्कादायक कांड
या अपघातात पिकअपमधील तेजस पंदरकर, मयूर पंदरकर तसेच कारमधील जयवंत रानुजी भाकरे, विजया जयवंत भाकरे आणि रामदास देवराम भाकरे (सर्व रा. माळवाडी, टाकळी हाजी) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र, चंद्रकला मुळे यांना वाचवण्यात यश आले नाही. याप्रकरणी कंटेनरचालक सरफराज बशीरभाई नरसलिया (वय ३८, रा. राजकोट, गुजरात) याच्यावर तेजस विलास पंदरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार रफिक शेख याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
