रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास...
साताराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. दोन रिक्षा समोरासमोर धडकल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताच्या वेळी दोन्ही रिक्षांमध्ये काही प्रवासी उपस्थित होते. सुदैवाने या भीषण घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही. दोन्ही रिक्षांमधील 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
सातारा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
जखमींना किरकोळ मार लागल्याची माहिती मिळाली असून, त्यांच्या प्रकृतीची अधिक माहिती अद्याप उपलब्ध नाही. या अपघातामुळे सातारा रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आणि अपघाताचे पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
फेसबुक लाईव्ह करताना वाहन थेट अंगावर...
दरम्यान, मृत्यूचा सापळा बनत असलेल्या नवले ब्रीजवरील अपघाताची मालिका थांबणार कधी? असा सवाल विचारला जात आहे. नवले पुलावरील अपघात रोखण्याबाबत उपाययोजना काय करता येतील या विषयावर ते फेसबुक लाईव्ह करत होते. त्याच दरम्यान एक वाहन त्यांच्या विरुद्ध दिशेने येत होते. ते वाहन थेट वसंत मोरे उभे असलेल्या दिशेने भरधाव वेगाने आलं. पण वेळीची मोरे यांचा कॅमेरामन आणि स्वत: वसंत मोरे रस्त्याच्या बाजुला झाल्याने थोडक्यात त्यांचा जीव वाचला.
विशेष मोहीम राबवून कारवाई
नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतूक सुरक्षेची स्थिती सुधारण्यासाठी पुणे आरटीओ कडून खेड शिवापुर टोल नाका ते नवले पुलदरम्यान विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाते. गेले 15 दिवसात या पथकाकडून 824 वाहन चालकांवर विविध नियम भंगाबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नियमाचे पालन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात येते.
