उतारावर कंटेनर 'न्यूट्रल' वर केला
प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) प्राथमिक तपासणी अहवालानुसार, या अपघातामागे अतिवेग हे मुख्य कारण आहे. कंटेनरचा वेग नियंत्रित करण्याच्या मर्यादेपलीकडे गेल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. विशेषतः, चालकाने उतारावर कंटेनर 'न्यूट्रल' वर केला असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. 'न्यूट्रल' वर गाडी असल्यामुळे वेग आणखी वाढला आणि ब्रेक लावणं शक्य झालं नाही.
advertisement
एकूण 8 जणांचा जीव गेला
अपघाताच्या तपासणीतून स्पष्ट झालं आहे की, 13 नोव्हेंबरला संध्याकाळच्या वेळी एका कंटेनर चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहनाने एकामागून एक सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिली. शेवटी, हा कंटेनर एका दुसऱ्या मोठ्या कंटेनरवर जाऊन आदळला, ज्यामुळे मोठी दुर्घटना झाली. या भीषण अपघातामध्ये एकूण 8 जणांना आपला जीव गमवावा लागला.
PMPML चा मोठा निर्णय
दरम्यान, नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि तात्काळ निर्णय घेतला आहे. कात्रज नवीन बोगदा ते चांदणी चौक या अपघातप्रवण उतारावर पीएमपीएलच्या बस चालकांना प्रतितास 30 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने बसेस न चालवण्याचे कठोर आदेश जारी करण्यात आले आहेत.
