पुणे बंगळुरु महामार्गावर आज संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. पुण्याच्या नवले पुलानजीक ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत एका कंटनेर चालकाचा ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे कंटेनर अनेक वाहनांना धडक देत चालला होता. त्याने बाईक,कार अशा अनेकांना धडक दिली होती.
advertisement
या धडकेनंतर पुढे जाऊन त्याच्या समोर एक कंटेनर आला होता. या कंटनेर आधी एक कार देखील होती. पण कंटेनर चालकाला काहीच करता न आल्याने तो थेट जाऊन कारसह कंटनेरला धडकला होता. ही धडक इतकी भीषण होती की कार जाऊन थेट कंटेनरच्या मागच्या टायरमध्ये घुसली होती. त्यामुळे कारचा अक्षरशं चेंदामेंदा झाला होता.या अपघातानंतर कारचा स्फोट देखील झाला होता त्यामुळे दोन्ही कंटेनरला देखील आग लागली होती.या अपघातात आता एक कंटेनर चालक आणि हेल्पर आणि दुसरा कंटेनर चालक असे तिघे जण आणि कारमध्ये एक कुटुंब होतं.साधारण तीन माणसं असण्याचा अंदाज आहे.त्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या अपघातात 20 जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे.
या भीषण अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच अग्निशामन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तसेच कात्रजकडून आणि साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात आहेत ,त्यांनी कुणीही तासभर तरी या महामार्गावर येण्याचा प्रयत्न करू नये,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
