बनावट ग्राहकाद्वारे सापळा
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली होती की, एनआयबीएम रस्त्यावरील 'सनश्री वुड्स कमर्शिअल प्रिमायसेस' इमारतीत स्पाच्या आड वेश्याव्यवसाय सुरू आहे. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी एक बनावट ग्राहक पाठवला. व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी छापा टाकला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
advertisement
नागालँडची व्यवस्थापिका अटकेत
या कारवाईत पोलिसांनी स्पा व्यवस्थापिका टी. झुंचुमबीनी थम्फीयोलोथा खितान (वय 32, मूळ रा. नागालँड, सध्या रा. कोंढवा) हिला अटक केली आहे. या रॅकेटमधील अन्य एका मुख्य आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. तर, चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांनी आता कडक मोहीम उघडली आहे.
