TRENDING:

Petrol Price Hike: इराण-इस्रायल युद्धाचा फटका, गॅसनंतर पेट्रोल दरांचा भडका, कितीनं महागलं?

Last Updated:

Petrol Price Hike: देशात गॅस दरवाढीनंतर पेट्रोलच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. ‘स्पीड’ आणि ‘पॉवर’ सारख्या प्रीमियम पेट्रोलचे दर वाढले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल, अमेरिकेतला संघर्ष तीव्र झाला आहे. त्याचा थेट परिणाम जगभरातील इंधन पुरवठा आणि दरांवर होत आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात देखील पेट्रोलियम कंपन्यांनी प्रीमियमचे दर वाढवले आहेत. आज, 20 मार्चपासून पुणेकरांना स्पीड आणि पॉवर पेट्रोलसाठी जादा पैसे मोजावे लागतील.
Petrol Price Hike: इराण-इस्रायल युद्धाचा फटका, गॅसनंतर पेट्रोल दरांचा भडका, पाहा नवे दर
Petrol Price Hike: इराण-इस्रायल युद्धाचा फटका, गॅसनंतर पेट्रोल दरांचा भडका, पाहा नवे दर
advertisement

पेट्रोलचे नवे दर

देशात गॅस दरवाढीनंतर पेट्रोलच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. ‘स्पीड’ आणि ‘पॉवर’ सारख्या प्रीमियम पेट्रोलचे दर वाढले आहेत. आता स्पीड/पॉवर पेट्रोलसाठी प्रति लिटर 2.09 रुपये जादा मोजावे लागतील. त्यामुळे पूर्वीचा 111.68 रुपयांवरून हे दर 113.77 रुपयांवर गेले आहेत. तर साध्या पेट्रोलचे दर पूर्वीप्रमाणेच कायम आहेत.

उन्हाळी सुट्ट्यांत प्रवास सोपा, पुणे-मुंबईतून नागपूरला 106 स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक

advertisement

पेट्रोलचे दर का वाढले?

मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका कच्च्या तेलाच्या जागतिक मार्केटला बसत आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने इंधनाच्या किमती वाढत आहेत. इराण आणि इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याने त्याचा तेलाचे उत्पादन आणि वितरणावर देखील परिणाम झाला आहे. त्यात गेल्या काही दिवसांत ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले वाढले आहेत. त्यामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

दरम्यान, होर्मुझच्या खाडीतून तेलाच्या पुरवठ्यावर इराणने निर्बंध घातले आहेत. पुढील काळात या ठिकाणी अडथळे निर्माण झाल्यास तेल पुरवठ्यावर अधिक गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. जगातील 20 टक्के तेल वाहतूक याच मार्गाने होते. हा संघर्ष सुरूच राहिल्यास पुढील काळात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर अजून भडकण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मराठी बातम्या/पुणे/
Petrol Price Hike: इराण-इस्रायल युद्धाचा फटका, गॅसनंतर पेट्रोल दरांचा भडका, कितीनं महागलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल