advertisement

Summer Special Train: उन्हाळी सुट्ट्यांत प्रवास सोपा, पुणे-मुंबईतून नागपूरला 106 स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Summer Special Train: मुंबईतील सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी अशा एकूण 52 तर पुणे-नागपूर-हडपसर अशा 54 विशेष ट्रेन धावणार आहेत.

Summer Special Train: उन्हाळी सुट्ट्यांत प्रवास सोपा, पुणे-मुंबईतून नागपूरला 106 स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
Summer Special Train: उन्हाळी सुट्ट्यांत प्रवास सोपा, पुणे-मुंबईतून नागपूरला 106 स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे-मुंबईतून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने अमरावती आणि नागपूरसाठी 106 विशेष फेऱ्यांची सोय केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मुंबई, पुणे आणि नागपूरचा प्रवास सोपा होणार आहे. मुंबईतील सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी अशा एकूण 52 तर पुणे-नागपूर-हडपसर अशा 54 विशेष ट्रेन धावणार आहेत.
सीएसएमटी ते नागपूर ट्रेनचे वेळापत्रक
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून गाडी क्र. 02141 ही द्विसाप्ताहिक विशेष गाड़ी 19 एप्रिल ते 14 जुलै या कालावधीत दर रविवार आणि मंगळवारी रात्री 12.20 वाजता सुटेल. नागपूर येथे त्याच दिवशी दु. 3.10 वाजता पोहोचेल. ही साप्ताहिक विशेष ट्रेन एकूण 26 फेऱ्या करणार आहे. गाडी क्र. 02142 ही द्विसाप्ताहिक विशेष गाडी 19 एप्रिल ते 14 जुलै या कालावधीत धावणार आहे. ती नागपूर येथून दर रविवार आणि मंगळवारी रात्री 8 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दु. 1.30 वाजता पोहोचेल. ही गाडी देखील 26 फेऱ्या करणार आहे.
advertisement
थांबे कोणते?
सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी द्विसाप्ताहिक विशेष गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्टेशनवर थांबा घेईल. ही गाडी 1 वातानुकूलित द्वितीय, 6 वातानुकूलित तृतीय, 9 शयनयान, 4 सामान्य द्वितीय आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल.
advertisement
पुणे-नागपूर-हडपसर गाडीचे वेळपत्रक
पुणे-नागपूर-हडपसर साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी (क्र. 09469) ही साप्ताहिक विशेष गाडी 21 एप्रिल ते 14 जुलै या काळात धावणार आहे. पुणे येथून दर मंगळवारी दु. 5.50 वाजता ही गाडी सुटेल. तर दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वाजता नागपूर येथे पोहोचेल. बडनेरा स्टेशनवर रात्री उशिरा 2.15 वाजता जाईल.
गाडी क्र.09470 ही साप्ताहिक विशेष गाडी 22 एप्रिल ते 15 जुलै या कालावधीत धावणार आहे. नागपूर येथून दर बुधवारी सकाळी 8 वाजता सुटेल आणि हडपसर येथे त्याच दिवशी रात्री 7.30 वाजता पोहोचेल. या गाडीची 3 वातानुकूलित द्वितीय, 15 वातानुकूलित तृतीय, सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन अशी रचना आहे.
advertisement
पुण्यातून बुधवारी विशेष गाडी
पुण्यातून 15 एप्रिल ते 15 जुलै या काळात दर बुधवारी साप्ताहिक विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्र. 09457 ही साप्ताहिक विशे, गाडी दर बुधवारी दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 6.30 वाजता नागपुरात पोहोचेल. त्याच मार्गावरून काडी क्रमांक 01448 ही साप्ताहिक विशेष गाडी नागपुरातून दर गुरुवारी सकाळी 8 वाजता सुटेल. हडपसर येथे त्याच दिवशी 7.30 वाजता पोहोचेल.
advertisement
दरम्यान, दोन्ही साप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येकी 14 फेऱ्या करणार आहेत. उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा असे एकूण 14 थांबे ही ट्रेन घेणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Summer Special Train: उन्हाळी सुट्ट्यांत प्रवास सोपा, पुणे-मुंबईतून नागपूरला 106 स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement