TRENDING:

रात्रीची वेळ, सुसाट वेग अन् नशेत कंटेनर चालक! पुण्यात पुन्हा थरार; 8 कार चिरडल्या, नेमकं काय घडलं?

Last Updated:

नशेमध्ये असलेल्या चालकाने भरधाव वेगाने कंटेनर चालवत रस्त्यावरील ७ ते ८ चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण घटनेत वाहनांचा चक्काचूर झाला असून काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
(गोविंद वाकडे, प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड : औद्योगिक नगरीतील मोशी परिसरात शुक्रवारी रात्री एका मद्यधुंद कंटेनर चालकाने अक्षरशः मृत्यूचे तांडव घातले. नशेमध्ये असलेल्या चालकाने भरधाव वेगाने कंटेनर चालवत रस्त्यावरील ७ ते ८ चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण 'हिट अँड रन' घटनेत वाहनांचा चक्काचूर झाला असून काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
पिंपरीत भीषण अपघात
पिंपरीत भीषण अपघात
advertisement

नेमकी घटना काय?

शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा थरार सुरू झाला. एक अवजड कंटेनर चाकण-हवेली रोडवरून टाटा मोटर्सच्या दिशेने सुसाट वेगाने जात होता. बोऱ्हाडेवाडी येथील राजमाता जिजाऊ चौक आणि हॉटेल सिल्वर ब्लू परिसरात हा कंटेनर आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नशेत असलेल्या चालकाने समोरून येणाऱ्या वाहनांना आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांना एकामागून एक धडक दिली.

advertisement

नागरिकांमध्ये घबराट आणि संताप

कंटेनरचा वेग आणि धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक चारचाकी गाड्यांचे पत्रे चपटे झाले असून गाड्यांचा अक्षरशः सांगाडा उरला आहे. या अपघातात काही पादचारी आणि दुचाकीस्वारही जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

चालक पोलिसांच्या ताब्यात

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त नागरिकांच्या तावडीतून चालकाला सोडवत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता तो मद्याच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी कंटेनर जप्त केला असून चालकावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
रात्रीची वेळ, सुसाट वेग अन् नशेत कंटेनर चालक! पुण्यात पुन्हा थरार; 8 कार चिरडल्या, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल