TRENDING:

Pune News: पुणेकरांनो, शु्क्रवारी या शाळा बंद; 6 हजार कंपन्यांनाही सुट्टी अन् वाहतुकीतही बदल, प्रशासनाचे मोठे निर्णय

Last Updated:

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात उद्या (शुक्रवारी, २३ जानेवारी) रंगणाऱ्या 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठे निर्णय घेतले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात उद्या (शुक्रवारी, २३ जानेवारी) रंगणाऱ्या 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठे निर्णय घेतले आहेत. स्पर्धेदरम्यान होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भोसरी एमआयडीसीतील ६ हजार कंपन्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, पुणे शहरातील शाळाही दुपारी १२ नंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे मोठे निर्णय
सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे मोठे निर्णय
advertisement

भोसरी एमआयडीसीतील कंपन्यांना शुक्रवारी सुट्टी: सायकल शर्यत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर, यशवंतनगर, टेल्को रस्ता आणि स्पाईन सिटी चौक या भागातून जाणार आहे. या मार्गावर वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने कंपन्यांना गुरुवारऐवजी शुक्रवारी सुट्टी देण्याचे आवाहन केले आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले की, सुमारे ६ हजार लघु व मध्यम उद्योग शुक्रवारी बंद राहतील. तसेच, महावितरणनेही गुरुवारी होणारे देखभाल-दुरुस्तीचे काम (लोडशेडिंग) शुक्रवारी हलवले आहे.

advertisement

Pune Traffic : पुणेकरांनो घराबाहेर पडताय? जरा थांबा! शुक्रवारी हे 93 रस्ते 'ब्लॉक', प्रवासाआधी पाहा यादी

शाळांच्या वेळेत बदल: पुणे शहरात स्पर्धेचा समारोप बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात येणार असल्याने, विद्यार्थ्यांची आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरू राहतील. १२ नंतर शाळांना सुट्टी देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंती! बाप्पाची पूजा कशी करावी? काय आहेत नियम? Video
सर्व पहा

ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुमारे ५८ ते ७५ किलोमीटरच्या मार्गावर पार पडणार असून, बालेवाडी ते बालगंधर्व या दरम्यानच्या प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी आणि पालकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांनो, शु्क्रवारी या शाळा बंद; 6 हजार कंपन्यांनाही सुट्टी अन् वाहतुकीतही बदल, प्रशासनाचे मोठे निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल