नेमका निर्णय काय?
पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, आता पीएमपी बसमध्ये कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ शूटिंग किंवा रिल्स तयार करण्यास अधिकृत बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता असे चित्रीकरण केल्यास आता थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार:
advertisement
केवळ बाहेरील व्यक्तीच नव्हे, तर पीएमपीचे चालक आणि वाहकही आता रडारवर आहेत. सेवेवर असताना गणवेशात किंवा ई-मशिनचा वापर करून व्हिडिओ बनवणे किंवा रिल स्टार्सना सहकार्य करणे, हा शिस्तभंगाचा प्रकार मानला जाईल. अशा कर्मचाऱ्यांवरही कडक प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अथर्व सुदामे आणि वादाचे कारण:
काही दिवसांपूर्वी अथर्व सुदामे याने पीएमपी बसमध्ये एक रील शूट केले होते. या व्हिडिओमध्ये पीएमपीचा गणवेश, ई-तिकिटिंग मशीन आणि बॅज यांसारख्या अधिकृत मालमत्तेचा वापर करण्यात आला होता. या रीलमध्ये प्रवाशांना दाखवण्याची पद्धत आक्षेपार्ह असल्याचा दावा करत पीएमपीने अथर्वला कायदेशीर नोटीस बजावली होती. महामंडळाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे कारण देत हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
ही नियमावली पीएमपीच्या स्वतःच्या बससोबतच ठेकेदारांच्या बसलाही लागू असणार आहे. त्यामुळे आता बसमध्ये रिल्स बनवणे यूट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर्सना महागात पडू शकते.
