४ हजार बसेसचा टप्पा गाठणार:
शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार लोकसंख्येच्या तुलनेत बसची संख्या खूपच कमी आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात मार्च २०२६ च्या अखेरपर्यंत ताफ्यातील एकूण बसेसची संख्या ४ हजार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. बसेसची संख्या वाढल्यामुळे मार्गावरील फेऱ्यांची वारंवारता वाढेल, परिणामी प्रवाशांचा थांब्यावरील प्रतीक्षा वेळ कमी होईल. यामुळे खासगी वाहनांकडे वळलेला नागरिक पुन्हा सार्वजनिक वाहतुकीकडे वळेल, अशी प्रशासनाला आशा आहे.
advertisement
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पीएमपी नवीन खरेदीमध्ये प्रदूषणमुक्त गाड्यांना प्राधान्य देणार आहे. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिक (E-Bus) आणि सीएनजी (CNG) बसेसचा समावेश असेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीची समस्या देखील सुटण्यास मदत होणार आहे. मार्चपर्यंत ४ हजार बसेसचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास केवळ उत्पन्नच वाढणार नाही, तर पुणेकरांना दर्जेदार आणि वेळेवर मिळणारी बससेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल, असा विश्वास पंकज देवरे यांनी व्यक्त केला आहे.
