TRENDING:

Women's Day 2026: महिला दिनाला बिनधास्त करा मैत्रिणींसोबत फिरायचा प्लॅन; पीएमपी सोडणार विशेष 'पर्यटन ई-बस', इथे करा बुकिंग

Last Updated:

जागतिक महिला दिन आणि जोडून आलेली रविवारची सुटी लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) महिला आणि पर्यटकांसाठी एक मोठी भेट दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : जागतिक महिला दिन आणि जोडून आलेली रविवारची सुटी लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) महिला आणि पर्यटकांसाठी एक मोठी भेट दिली आहे. येत्या ८ मार्च रोजी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देण्यासाठी ८ विशेष वातानुकूलित (AC) ई-बसेस सोडण्यात येणार आहेत.
पीएमपी सोडणार विशेष पर्यटन ई-बस (फाईल फोटो)
पीएमपी सोडणार विशेष पर्यटन ई-बस (फाईल फोटो)
advertisement

फक्त ५०० रुपयांत दिवसभर फिरण्याची मजा!

पीएमपी प्रशासनाने पर्यटकांसाठी अत्यंत सवलतीच्या दरात ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रतिव्यक्ती फक्त ५०० रुपये तिकीट दरामध्ये पुणे परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांची सफर करता येणार आहे. विशेषतः महिला ग्रुप, कुटुंबे आणि मित्रपरिवाराला डोळ्यासमोर ठेवून या वातानुकूलित बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

advertisement

कुठून सुटणार बसेस?

या विशेष पर्यटन बसेस प्रामुख्याने स्वारगेट मुख्य बसस्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून पीएमपीने एकूण १३ पैकी ८ प्रसिद्ध पर्यटन मार्गांची निवड केली आहे. या प्रवासात प्रवाशांना सुरक्षित आणि सुखद अनुभवासाठी ई-बसेसचा वापर केला जाणार आहे.

बुकिंग कुठे कराल?

या पर्यटन सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना काही प्रमुख बसस्थानकांवर आधीच नोंदणी (Booking) करता येईल. यात डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, मनपा भवन, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी आणि निगडी बसस्थानक इथे तुम्ही नोंदणी करू शकता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचं मार्केट हाललं, लिंबू अन् शेवग्यालाही भाव, कुठं मिळाला सर्वाधिक दर?
सर्व पहा

पुणेकरांनी या सुटीचा आनंद घेण्यासाठी आणि महिला दिन खास करण्यासाठी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Women's Day 2026: महिला दिनाला बिनधास्त करा मैत्रिणींसोबत फिरायचा प्लॅन; पीएमपी सोडणार विशेष 'पर्यटन ई-बस', इथे करा बुकिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल