TRENDING:

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! पोलीस भरतीमुळे 'या' भागातील वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी तपासा पर्यायी मार्ग

Last Updated:

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई (चालक) पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची मैदानी चाचणी आज पार पडणार आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई (चालक) पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची मैदानी चाचणी आज म्हणजेच रविवारी, ८ मार्च रोजी सहकारनगरमधील कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, भरती प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि सुरक्षितता राखली जावी, यासाठी सहकारनगर भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
सहकारनगरमधील वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
सहकारनगरमधील वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
advertisement

वाहतुकीत नेमके काय बदल?

रविवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच मैदानाकडे जाणाऱ्या आणि परिसरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची मोठी संख्या लक्षात घेता, स्टेडियमकडे जाणारे काही रस्ते सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवले जात आहेत.

वाहतूक पोलिसांचे आवाहन

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदानी चाचणी संपेपर्यंत हे बदल लागू राहतील. या काळात वाहनचालकांनी सहकारनगर परिसरात जाणे टाळावे किंवा पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. यामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

कै. सदू शिंदे स्टेडियम ते ट्री पॉईंटपर्यंत असलेल्या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी तळजाई ते बिकानेर मिठाई चौक दरम्यान ये जा करण्यासाठी स्टेडियम शेजारील डांबरी रस्त्याचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केलं आहे. शनिवारी (७ मार्च) आणि रविवारी (८ मार्च) भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी मैदानावर राबविण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! पोलीस भरतीमुळे 'या' भागातील वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी तपासा पर्यायी मार्ग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल