TRENDING:

Pune Porsche Accident : 'मी सर्वांची नावं घेणार'; पुणे Porsche अपघात प्रकरणी डॉक्टरची धमकी, कोण अडकणार?

Last Updated:

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुने ससूनमधील डॉ. अजय तावरेंनं बदलल्याचं आता लपून राहिलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी पुणे पोलिसांनी अजय तावरेसह तिघांना बेड्या ठोकल्यात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
'मी सर्वांची नावं घेणार'; पुणे Porsche अपघात प्रकरणी डॉक्टरची धमकी, कोण अडकणार?
'मी सर्वांची नावं घेणार'; पुणे Porsche अपघात प्रकरणी डॉक्टरची धमकी, कोण अडकणार?
advertisement

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुने ससूनमधील डॉ. अजय तावरेंनं बदलल्याचं आता लपून राहिलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी पुणे पोलिसांनी अजय तावरेसह तिघांना बेड्या ठोकल्यात. पण अटकेनंतर अजय तावरेनं या काही धमकीवजा इशार दिलाय. त्यामुळे या प्रकरणात तावरेचा गॉड फादर कोण? अशी चर्चा सुरु झालीय.

पुणेच्या कल्याणीनगर हिट अँण्ड रन प्रकरणातील अल्पवीयन आरोपीला वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला गेला होता. ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर यानं डॉ. अजय तावरेच्या सांगण्यावरून अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले होते. या प्रकरणी पुणे पोलिसांनी डॉ. तावरे आणि डॉ. होळणोर यांना बेड्या ठोकल्या. अटकेनंतर डॉ. तावरेंनी धमकीवजा इशारा दिला आहे.

advertisement

मी शांत बसणार नाही, सर्वांची नावं घेईन, असं तावरे म्हणालाय, त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. डॉ. तावरेंनं हा धमकीवजा इशार कुणाला दिलाय? या प्रकरणात आणखी कोणा कोणाचा समावेश आहे ? कुणाच्या सांगण्यावरून डॉ. तावरेनं रक्त नमुने बदलले? डॉ.अजय तावरेंना कुणी फोन केला होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

advertisement

दरम्यान या प्रकरणी सामाजिक कार्यकत्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 'अजित पवार यांचा फोन ताबडतोब जप्त करा आणि तपासणी साठी पाठवा', अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

एकीकडं दमानियांनी थेट अजित पवारांवर आरोप केलाय तर दुसरीकडे स्थानिक काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. तावरेंना नेमका कोणी फोन केला तेही तपासलं जावं, पोलिसांच्या चौकशीदरम्यान, एवढीच माझी मागणी आहे, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.

advertisement

डॉ. तावरेनं कुणाला गर्भित इशारा दिला आहे. ससूनमधील आणखी कुणी या गुन्ह्यात सहभागी आहे का? की त्यानं एखाद्या राजकारण्याला हा इशारा दिलाय ? असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Porsche Accident : 'मी सर्वांची नावं घेणार'; पुणे Porsche अपघात प्रकरणी डॉक्टरची धमकी, कोण अडकणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल