TRENDING:

प्रेमसंबंधाला विरोध अन् 'तो' वाद; अखेर पुण्यातील त्या खळबळजनक गोळीबार प्रकरणात 11 वर्षांनंतर फुटलं बिंग

Last Updated:

प्रेमसंबंधातील टोकाचा विरोध आणि बांधकाम व्यवसायातील वर्चस्व या वादातून 2014 मध्ये पुनावळे परिसरात झालेल्या गोळीबाराने संपूर्ण पुणे हादरले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी चिंचवड : प्रेमसंबंधातील टोकाचा विरोध आणि बांधकाम व्यवसायातील वर्चस्व या वादातून 2014 मध्ये पुनावळे परिसरात झालेल्या गोळीबाराने संपूर्ण पुणे हादरले होते. तब्बल ११ वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर अखेर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन मुख्य आरोपींना जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.
गोळीबार प्रकरणात 11 वर्षांनंतर फुटलं बिंग (प्रतिकात्मक फोटो)
गोळीबार प्रकरणात 11 वर्षांनंतर फुटलं बिंग (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

काय होतं प्रकरण?

१८ ऑक्टोबर २०१४ रोजी माळवाडी-पुनावळे येथील एका बांधकाम साईटच्या कार्यालयासमोर राजेश ऊर्फ राजाभाऊ सखाराम दर्शले (वय ४६) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध रितीने पिस्तुलातून गोळ्या झाडून दर्शले यांचा गेम केला होता. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

ॲपवर दाखवलेली रक्कम की मीटरप्रमाणे भाडं? वादाला भयंकर वळण, कॅब चालकानं दातानं तोडलं हिंजवडीतील आयटी इंजिनिअरचं बोट

advertisement

या खटल्यात न्यायालयाने शाहरुख ऊर्फ पाप्या रशीद शेख आणि प्रकाश अण्णा डोंगरे या दोघांना दोषी ठरवत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन सुदाम कुदळे याचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाला, तर पुराव्याअभावी इतर काही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाला मिळेना योग्य भाव, शेतकऱ्याने केला भारी प्रयोग, आता 9 लाख रुपयांचा नफा
सर्व पहा

तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला होता. विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. रमेश घोरपडे यांनी न्यायालयात सरकारी बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. ११ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर दर्शले कुटुंबाला न्याय मिळाला असून, गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
प्रेमसंबंधाला विरोध अन् 'तो' वाद; अखेर पुण्यातील त्या खळबळजनक गोळीबार प्रकरणात 11 वर्षांनंतर फुटलं बिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल