नीरा नदीकाठच्या गुळूंचे येथील जागृत देवस्थान असलेल्या ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्ताने कार्तिक शुद्ध द्वादशीस पारंपारिक पद्धतीने काटेबारस यात्रा साजरी करण्यात येते. कार्तिक शुद्ध व्दादशीस इथं यात्रा भरते. या जत्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मोठी गर्दी होते. भाविक प्रथेनुसार देवाला उघड्या अंगाने दंडवत घालतात आणि 'हर भोले -हर महादेव' असा जयघोष करीत एकामागून एक असे भक्त उघड्या अंगाने उड्या घेऊन काट्यां-मध्ये लोळण घेतात.
advertisement
पारंपरीक पद्धतीने श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा साजरा; काढण्यात आली मिरवणूक, Video
ज्योतिर्लिंगाचे भक्त बाभळीच्या काट्याच्या ढिगांवर उघड्या अंगाने पाण्यात सूर मारावा त्याप्रमाणे उड्या घेतात, हे या यात्रेचं आकर्षण मानलं जाते. त्यामुळे ज्योतिर्लिंगाची ही यात्रा काटेबारस यात्रा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे.
काटेबारस यात्रेला शेकडो वर्षाचे परंपरा आहे. प्राचीन पंरपरा असलेल्या या यात्रेला खास मान आहे. सकाळी पालखी नदी घाटावर जावून देवाला आंघोळ घातली जाते आणि पालखी मंदिरात येते. मंदिराच्या प्रांगणात गावकरी काट्यांचा ढिग आणून रचतात. पालखी आल्यावर त्या ढिगाला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात आणि नंतर गुलालाची उधळण करत लोक काट्यात उड्या घेतात. असं केल्यानं आपलं दु:ख दूर होतं अशी लोकांची श्रद्धा आहे. ही काटेरी परंपरा मोडण्यासाठी अनेकदा प्रयत्नही झालेत. मात्र गावकरी ती परंपरा सोडायला तयार नाही.
शुभ मंगल सावधान..! तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त; कोणत्या महिन्यात सर्वाधिक तारखा?
बारा दिवस चाललेल्या या काटेबारस यात्रेची काटे मोडून सांगता करण्यात आली. अनेक भाविकांना काट्यांच्या ढिगाऱ्यावर उड्या मारले, काही भाविक नाचलेही.
या यात्रेमध्ये सुमारे 250 भाविक भक्तांनी या काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उघड्या अंगाने उड्या घेतल्या.
