TRENDING:

Pune Station : पुणे स्थानकावर प्रवाशांसाठी मोठे बदल लागू; प्रवासापूर्वी वाचा महत्त्वाची माहिती

Last Updated:

Pune Railway Station : तुम्हीही होळीनिमित्ताने गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकातून गाडी पकडणार आहात तर थांबा. तिथं जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : येत्या काही दिवसांवर होळी सण आलेला आहे. या सणानिमित्ताने गावी जाणाऱ्यांची संख्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात होत असते. या सर्व पाश्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर एक नवा प्लॅन करण्यात आलेला आहे.
News18
News18
advertisement

प्रशासनाचा अ‍ॅक्शन प्लॅन काय?

मिळालेल्या माहितीनुसार, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने पुणे रेल्वेस्थानक येथे मोठी गर्दी होत आहे. ही सर्व गर्दीची परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली आहे. स्थानक परिसरात प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये काम करताना दिसले.

स्थानकाती प्लॅटफॉर्मलगत असलेल्या पार्सल विभागाशेजारी होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी उत्तर भारतासह इतर राज्यांत जाणाऱ्या होळी विशेष गाड्यांच्या प्रवाशांना थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानकावर अनावश्यक गर्दी होऊ नये आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

काही वर्षापूर्वी घडली धक्कादायक घटना

काही वर्षांपूर्वी गर्दीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. अशा घटना टाळण्यासाठी यंदा प्रशासन अधिक सतर्क आहे. होळीबरोबरच दसरा, दिवाळी आणि छठपूजेच्या काळातही अशीच व्यवस्था केली जाणार आहे.

कोणत्या मिळणार प्रवाशांना सुविधा

होल्डिंग एरियामध्ये मोबाईल चार्जिंग पॉईंट, मोबाइल स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्यासाठी जागा, पंखे तसेच ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षणासाठी शेडची व्यवस्था आहे.एवढंच नाही तर प्रवाशांना ट्रेनची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फलक लावण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा जवानांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आई अंबाबाईचा हाच संस्कार! लेकीचं लग्न तोंडावर, पुजाऱ्याला सापडलं सोनं, काय केलं?
सर्व पहा

याशिवाय अतिरिक्त तिकीट काऊंटर, एटीव्हीएम मशीन, अधिक कर्मचारी, आरपीएफ जवान आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदत केंद्र आणि कंट्रोल रूमही सुरू करण्यात आली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Station : पुणे स्थानकावर प्रवाशांसाठी मोठे बदल लागू; प्रवासापूर्वी वाचा महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल