पुणे : लक्ष्मीच्या पावलांनी घरात आलेल्या सुनेला छळ करून तिचे हाल करून दीप्ती मगर चौधरीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आले आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्य हादरलं असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. दरम्यान याप्रकरण धक्कादयक माहिती समोर आली आहे. आमच्या वंशाला दिवा हवा, मुलगी नको, असे म्हणत पाच महिन्यांच्या गर्भातील बाळाचा जबरदस्ती गर्भपात करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
advertisement
लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांत सुरू झालेला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ अखेर दिप्तीच्या आत्महत्येने संपला. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी तर दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात वर्षापूर्वी धुमधडाक्यात शाही विवाह
आत्महत्या केलेल्या दिप्तीचा सात वर्षापूर्वी धुमधडाक्यात शाही विवाह पार पडला होता. दिप्तीची सासू सरपंच तर सासरे शिक्षक होते. सरपंच घरात मुलगी नांदायला जाणार असल्याने आई- वडिलांनी देखील सासरच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. लग्नामध्ये दिप्तीला 50 तोळे सोने देण्यात आले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसातच सासरच्यांनी दिप्तीचा वेगवेगळ्या कारणांवरून छळ करण्यास सुरुवात केली.
35 लाख कॅश दिले
लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीप्तीला मुलगी झाली. मात्र मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली. डिलिव्हरीनंतर दीप्ती सासरी नांदायला गेल्यावर व्यवसाय अडचणीत असल्याचे कारण देत माहेरून पैशांची मागणी करण्यात आली. त्यानुसार दीप्तीच्या पालकांनी 10 लाख रुपये दिले. त्यानंतर लग्नात गाडी दिली नाही” या कारणावरून पुन्हा 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कमही रोख स्वरूपात दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
गर्भलिंग तपासणी कर नाहीतर घरातून चालती हो...
पहिल्या मुलीनंतर दिप्तीला पुन्हा दिवस गेल्यानंतर तिच्या इच्छेविरोधात तिची जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी केली. गर्भलिंग तपासणीस नकार दिल्यानंतर पतीने मारहाण केली. आम्हाला आमचे वंशाला दिवा हवा आहे तु तपासणी करणार नसेल तर आमचे घरातून चालती हो असे म्हणत गर्भलिंग तपासणी केली. तपासणीत पोटातील बाळ हे मुलगी असल्याचे समजल्यावर सासरच्यांनी जबरदस्तीने माझा गर्भपात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
उरळी कांचन परिसर हादरला
आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या सरपंच झाली होती. तर सासरा शिक्षक आहे. पुण्यात सासरच्या मंडळीच्या छळापायी काहीच दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे या विवाहितेने आपल्या आयुष्याची अखेर केली होती. वैष्णवीसोबत ज्याप्रकारचा छळ आणि मानसिक जाच करण्यात आला त्याने संपूर्ण महाराष्ट्र संतापला होता. त्यानंतर आता पुण्यात हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून दिप्तीने आपला जीव दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत
