TRENDING:

Pune Fraud: स्वस्तात सोनं घेण्याची चूक तुम्ही पण करत नाही ना? पुण्यातील महिलेसोबत धक्कादायक प्रकार, सव्वाकोटी गमावले

Last Updated:

तक्रारदार महिला आणि आरोपींची ओळख होती. दोन वर्षांपूर्वी आरोपींनी या महिलेला आणि त्यांच्या पतीला "सोन्याचे दर सध्या कमी आहेत, लवकरच ते वाढणार आहेत. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल," असे सांगून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : गुंतवणुकीच्या नावाखाली स्वस्तात सोनं देण्याचं आमिष दाखवून एका ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
स्वस्त सोन्याचं आमिष पडलं महागात (प्रतिकात्मक फोटो)
स्वस्त सोन्याचं आमिष पडलं महागात (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी फसवणूक कशी झाली?

हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५) आणि रुपाली हेमंत खरोटे (वय ३८, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. तक्रारदार महिला आणि आरोपींची ओळख होती. दोन वर्षांपूर्वी आरोपींनी या महिलेला आणि त्यांच्या पतीला "सोन्याचे दर सध्या कमी आहेत, लवकरच ते वाढणार आहेत. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल," असे सांगून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले.

advertisement

आरोपींनी मोबाइलवर सोन्याच्या दागिन्यांची आणि बिस्किटांची छायाचित्रे पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी १ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम उकळली. सुरुवातीला काही प्रमाणात सोने आणि परतावा देऊन विश्वास निर्माण केला, मात्र त्यानंतर उर्वरित रक्कम आणि सोन्याचे बिस्किट देण्यास टाळाटाळ केली. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ महिलेने पोलिसांत धाव घेतली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रिक्षा ड्रायव्हरच्या लेकीनं ठरवलं अन् गाव बदललं, खाकी वर्दीनं दिली मुलींना दिशा
सर्व पहा

या दाम्पत्याने एकूण १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत. आर्थिक गुंतवणुकीच्या योजनांमध्ये पडण्यापूर्वी त्या योजनेची आणि व्यक्तीची पूर्ण शहानिशा करणे किती गरजेचे आहे, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखा अशा प्रकरणांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Fraud: स्वस्तात सोनं घेण्याची चूक तुम्ही पण करत नाही ना? पुण्यातील महिलेसोबत धक्कादायक प्रकार, सव्वाकोटी गमावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल