TRENDING:

रात्री ढाब्यासमोरील ट्रकखाली झोपला तरुण; पहाटे डोळे उघडण्याआधीच मृत्यूनं गाठलं; पुण्यात अंगावर काटा आणणारी घटना

Last Updated:

रात्रीच्या वेळी सुरक्षित जागा म्हणून ट्रकखाली झोपलेल्या तरुणाला पहाटेच्या वेळी ट्रकचालकाने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे-नगर महामार्गावरील शिरूर तालुक्यातील सरदवाडी हद्दीतून एक अतिशय विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. यात एका तरुणाचा अतिशय दुर्दैवी अंत झाला. रात्रीच्या वेळी सुरक्षित जागा म्हणून ट्रकखाली झोपलेल्या तरुणाला पहाटेच्या वेळी ट्रकचालकाने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात योगेश आसाराम साठे (वय २९, रा. जालना) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
ट्रकखाली झोपलेल्या तरुणाला पहाटेच्या वेळी ट्रकचालकाने चिरडलं (प्रतिकात्मक फोटो)
ट्रकखाली झोपलेल्या तरुणाला पहाटेच्या वेळी ट्रकचालकाने चिरडलं (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सरदवाडी येथील 'राजस्थान ढाब्या'च्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला. २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ट्रक (क्रमांक TN 88 M 1864) चा चालक बालसुब्रह्मण्यम मुर्गेशन (रा. तामिळनाडू) याने आपला ट्रक पुढे नेण्यासाठी सुरू केला. मात्र, रात्रीच्या वेळी ट्रकखाली योगेश साठे झोपलेले असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. निष्काळजीपणे ट्रक पुढे घेतल्याने मागील चाक योगेश यांच्या कंबरेवरून गेले. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

advertisement

मदत करण्याऐवजी चालकाचे पलायन

हृदयद्रावक बाब म्हणजे, अपघात झाल्याचे लक्षात येऊनही चालकाने जखमीला मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना कळवण्याऐवजी घटनास्थळावरून पोबारा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने अत्यंत बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने एका निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चालक मुर्गेशन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी चालकाचा शोध घेतला जात आहे. पार्किंगमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला वाहन उभे असताना त्याखाली झोपणे कसे जिवावर बेतू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
रात्री ढाब्यासमोरील ट्रकखाली झोपला तरुण; पहाटे डोळे उघडण्याआधीच मृत्यूनं गाठलं; पुण्यात अंगावर काटा आणणारी घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल