नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी प्रणव हा वारंवार आपल्या कारमधून महाविद्यालयाच्या आवारात यायचा. गाडीत बसून तो अत्यंत अश्लील कृत्य करत असे. पँट गुडघ्यापर्यंत खाली करून आणि समोर मोबाईल धरून तो तिथून जाणाऱ्या विद्यार्थिनींकडे बघून अश्लील चाळे करायचा.
नगरसेविकेच्या तक्रारीनंतर कारवाई
advertisement
हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, भाजपच्या एका महिला नगरसेविकेला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. नगरसेविकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रणव वझे याला अटक केली.
पालकांमध्ये संतापाची लाट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव वझे याने अशा प्रकारचे कृत्य करण्याची ही दुसरी वेळ आहे. तो वारंवार अशा प्रकारे विद्यार्थिनींची छेड काढत असे. या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. "मुलावर कठोर कारवाई व्हावी," अशी मागणी पालकांकडून करण्यात येत असून, महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
