नेमकी घटना काय?
मकरसंक्रांतीचा सण जवळ आल्याने वाण लुटण्यासाठी वस्तूंची खरेदी करण्यासाठी एक ३१ वर्षीय महिला बुधवारी शुक्रवार पेठेतील भुतकर हौद परिसरात गेली होती. येथील एका प्लास्टिक वस्तूंच्या दुकानात त्यांनी मसाल्याचे डबे पाहिले. डब्यांची किंमत विचारल्यानंतर महिलेने दुकानदाराला 'भाव कमी करा' अशी विनंती केली. ग्राहकाने केलेली ही साधी विनंती दुकानदाराला इतकी झोंबली की, त्याने थेट सर्व मर्यादा ओलांडल्या.
advertisement
किंमत कमी करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून विक्रेत्याने त्या महिलेशी अत्यंत अश्लील भाषेत संवाद साधला आणि गैरवर्तन केले. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे महिला प्रचंड हादरली. मात्र, तिने डगमगून न जाता तातडीने जवळच असलेल्या शुक्रवार पेठ पोलीस चौकीत धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
महिलेच्या तक्रारीवरून फरासखाना पोलिसांनी संबंधित प्लास्टिक विक्रेत्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार येसादे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, बाजारपेठेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सणासुदीच्या काळात खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांनी अशा प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
