प्रकल्पाचे महत्त्व
पुणे आणि सोलापूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या मार्गावर दिवसभर प्रचंड वाहतूक असते. हडपसर ते यवत या टप्प्यावर होणाऱ्या कोंडीमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाया जातो. या प्रकल्पाच्या माध्यमातून सहा पदरी उड्डाणपूल उभारला जाणार असल्याने प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. स्थानिक आमदार राहुल कुल यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असून, त्यांच्या प्रयत्नांना हे मोठे यश मानले जात आहे.
advertisement
दौंडच्या विकासाला मिळणार चालना
हा केवळ एक रस्ता नसून, दौंड तालुक्याच्या अर्थकारणाला बळ देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि उद्योगांनाही मोठी चालना मिळेल. पुणे शहरापासून यवतपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याने औद्योगिक आणि व्यावसायिकदृष्ट्या हा मार्ग अतिशय मोक्याचा ठरेल. पुढील काळात या उड्डाणपुलामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे.
