TRENDING:

कचऱ्यात दिसली चमकणारी वस्तू; बाहेर काढलं तर सोनं, मग पुण्यातील कचरावेचक महिलेनं जे केलं ते मन जिंकणारं

Last Updated:

सोमवारी नेहमीप्रमाणे त्यांनी घरोघरी जाऊन कचरा गोळा केला आणि त्यानंतर त्या गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी बसल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झालेली असताना दागिने चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. मात्र, यातही एक अशी घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हाला सकारात्मक वाटेल. "माणुसकी अजूनही जिवंत आहे" याची प्रचिती देणारी एक कौतुकास्पद घटना पुण्यात समोर आली आहे. कचरा संकलनाचे काम करणाऱ्या 'स्वच्छ' सहकारी संस्थेच्या सभासद शालन लक्ष्मण वायला यांनी कचऱ्यात सापडलेली अंगठी परत केली. एक तोळ्याची सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे तिच्या मूळ मालकाकडे सोपवून त्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे.
कचऱ्यात सापडलं सोनं (AI Image)
कचऱ्यात सापडलं सोनं (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

शालन वायला या गेल्या १० वर्षांपासून जयश्री जगदाळे यांच्या घरी कचरा संकलनाचे काम करत आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे त्यांनी घरोघरी जाऊन कचरा गोळा केला आणि त्यानंतर त्या गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी बसल्या. कचरा बाजूला काढत असताना त्यांना अचानक एक सोन्याची अंगठी सापडली. ही अंगठी सुमारे १० ग्रॅम (एक तोळा) वजनाची होती.

advertisement

Pune Accident: 4 वर्षाचा आरव आईचा हात धरून ओलांडत होता रेल्वे रूळ, वेगात ट्रेन आली अन् क्षणात सगळंच संपलं

कचऱ्यात कशी गेली अंगठी?

ही अंगठी जयश्री जगदाळे यांची सून प्रियांका जगदाळे यांची होती. सकाळी मुलाचा टिफिन भरण्याच्या घाईगडबडीत प्रियांका यांनी आपली अंगठी काढून एका कागदात गुंडाळून ठेवली होती. मात्र, कामाच्या व्यापात त्या अंगठीचा विसर पडला आणि तो कागद चुकून कचऱ्याच्या डब्यात गेला. आपली मौल्यवान अंगठी हरवल्याचे लक्षात आल्यावर जगदाळे कुटुंबीय चिंतेत होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मकर संक्रांतीसाठी घेवर आणि फेनी, जालन्यात अतिशय प्रसिद्ध पदार्थ, इथं भरतंय बाजार
सर्व पहा

अंगठी सापडताच शालन वायला यांनी कोणतीही लालसा न बाळगता तातडीने जगदाळे कुटुंबियांशी संपर्क साधला आणि ती त्यांच्या स्वाधीन केली. आपली लग्नाची आठवण असलेली अंगठी सुखरूप परत मिळाल्याने प्रियांका जगदाळे यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जगदाळे कुटुंबियांनी शालन यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.'स्वच्छ' संस्थेच्या वतीनेही त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
कचऱ्यात दिसली चमकणारी वस्तू; बाहेर काढलं तर सोनं, मग पुण्यातील कचरावेचक महिलेनं जे केलं ते मन जिंकणारं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल