चारचाकी कारला जोरदार धडक
हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास गरवारे कॉलेज चौकात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने रस्त्यावर धावणाऱ्या चारचाकी कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चारचाकी कार जागेवरच पलटी झाली. या अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. तसेच दुचाकीचा देखील चुराडा झाला आहे.
advertisement
तातडीने उपचार सुरू
या अपघातात कार चालकही किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून अपघाताला नेमके कोणते कारण जबाबदार होते, याचा तपास सुरू आहे. रात्रीच्या वेळी अति वेगाने वाहन चालवल्याने अशा प्रकारच्या घटना शहरात वाढत आहेत.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू
दरम्यान, भरधाव वेगामुळे झालेल्या या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आलाय.
