TRENDING:

दीड वर्षाचा 'स्मृतिराज'! नील भालेरावचा 2 मिनिटांत 45 कार ब्रँड्स ओळखत नवा विक्रम, Video पाहून अवाक व्हाल

Last Updated:

त्याने २ मिनिटे ५३ सेकंदांत जगातील सुमारे ४५ हून अधिक कार ब्रँड्सची अचूक ओळख करून देत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये मानाचे स्थान मिळवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहरासाठी अभिमानास्पद असलेली एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्या वयात अनेक लहान मुलं साधं हाताने जेवण करायलाही शिकत नाही, त्या वयात एक चिमुकल्याने एक विक्रम आपल्या नावी केला आहे. अवघ्या दीड वर्षांच्या नील निखिल भालेराव या चिमुकल्याने आपल्या अभूतपूर्व स्मरणशक्तीच्या जोरावर एक अनोखा विक्रम आपल्या नावी केला आहे. त्याने २ मिनिटे ५३ सेकंदांत जगातील सुमारे ४५ हून अधिक कार ब्रँड्सची अचूक ओळख करून देत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. एवढ्या लहान वयात मिळवलेल्या या विक्रमामुळे नीलचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नील निखिल भालेराव
नील निखिल भालेराव
advertisement

नीलने केलेला हा विक्रम केवळ आकड्यांचा खेळ नसून लहान वयात मोठ्या प्रमाणावर माहिती लक्षात ठेवणे आणि ती आत्मविश्वासाने सादर करणे, हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. त्याच्या या अलौकिक गुणांमुळेच हा विक्रम अधिक महत्त्वाचा ठरला आहे. भविष्यकाळात त्याच्याकडून आणखी मोठ्या प्रयत्नांची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

advertisement

Ticket Scam Alert : AI ने बनवला एसी लोकल पास, पण एका चूकीनं सगळं बोंबललं! पोलिसांनी अंबरनाथच्या कपलला कसं पकडलं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

नीलच्या या उल्लेखनीय यशामागे त्याची आई प्रेरणा भालेराव आणि वडील निखिल भालेराव यांचे योग्य मार्गदर्शन, संयम आणि प्रोत्साहन ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. पालकांनी मुलांमधील विशेष गुण ओळखून त्यांना योग्य दिशेने प्रोत्साहन दिल्यास ते मोठे यश संपादन करू शकतात, हे नीलच्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. त्याच्या या विक्रमामुळे महाराष्ट्रासह देशाचे नावही उंचावले आहे. हा विक्रम नीलच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे, असं कौतुक होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
दीड वर्षाचा 'स्मृतिराज'! नील भालेरावचा 2 मिनिटांत 45 कार ब्रँड्स ओळखत नवा विक्रम, Video पाहून अवाक व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल